Home Uncategorized *मराठी वाचकांना भुरळ पाडणारे कादंबरीकार भैरप्पा यांच्या निधनाने साहित्याचे एक पर्व संपले*...

*मराठी वाचकांना भुरळ पाडणारे कादंबरीकार भैरप्पा यांच्या निधनाने साहित्याचे एक पर्व संपले* *- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे*

58
0

मुंबई
“देशातील ज्येष्ठ कन्नड साहित्यिक आणि प्रख्यात कादंबरीकार एस.एल. भैरप्पा यांच्या जाण्याने देशातल्या साहित्य विश्वातले पर्व संपले.” अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे.
“भैरप्पा यांच्या अनेक कादंबऱ्यांचा मराठीमध्ये देखील अनुवाद झाला असून या कादंबऱ्यांनी मराठी मनाला अक्षरशः भुरळ पाडली.”असे सांगून उपमुख्यमंत्री म्हणतात की, “भैरप्पा यांच्या कादंबऱ्यांनी वाचकांना एका वेगळ्या भावविश्वात नेऊन सोडले. त्यांच्या लेखनातून संशोधन, अभ्यास आणि विचारांचे दर्शन घडते. त्यांचे साहित्य आजही वाचकांना खिळवून ठेवतात.
अनेक भाषांमधून अनुवादित झालेल्या त्यांच्या कादंबऱ्यानी वाचकांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले.
भैरप्पा यांना साहित्य अकादमी पुरस्कार, सरस्वती सन्मान, पद्मभूषण, पद्मश्री आदी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. सकस लेखन करणाऱ्या या महान साहित्यिकास माझी भावपूर्ण श्रद्धांजली! असेही उपमुख्यमंत्री शिंदे म्हणतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here