यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने दि. १ ऑक्टोबर या ‘जागतिक ज्येष्ठ नागरिक दिना’चे औचित्य साधून दरवर्षी ज्येष्ठ नगरिकांसाठी आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात येते. यानिमित्ताने ‘यशवंतराव चव्हाण ज्येष्ठ नागरिक राज्यस्तरीय कृतज्ञता सन्मान व यशवंतराव चव्हाण ज्येष्ठ नागरिक संघ/ संस्था राज्यस्तरीय कृतज्ञता सन्मान ‘प्रदान करण्यात येतात. सेंटरच्या कार्याध्यक्ष खा. सुप्रिया सुळे यांच्या संकल्पनेतून सुरु झालेल्या,या कार्यक्रमाला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे.
आपल्या कर्तृत्वकार्यातून सेवानिवृत्त झाल्यानंतर, आपल्या अनुभवाच्या जोरावर समाजाभिमुख कार्य करणारे अनेक ज्येष्ठ नागरिक आहेत, जे समाजोपयोगी कार्य करीत आहेत. त्यांचा यथोचित सन्मान व्हावा हा या कृतज्ञता सन्मानाचा उद्देश्य आहे. याच अनुषंगाने ‘ज्येष्ठ नागरिक कृतज्ञता सन्मान’ -२०२५ मध्ये
दोन महिला वर्ग
१ सुशीला ओडेयार ८० वर्ष – कोल्हापूर
२ चेलनादेवी खुरपे ८२ वर्ष – सांगली
दोन पुरुष वर्ग
१अरुण रोडे ८० वर्ष – पुणे
२ रमेश दुसे ८२ वर्ष – छत्रपती संभाजी नगर
एक दिव्यांग प्रवर्ग
१ श्रीराम पान्हेरकर ७० वर्ष – चंद्रपूर
एक तृतीयपंथी प्रवर्ग
१ सलमा खान – मुंबई
एक संघ
१ज्येष्ठ नागरिक संघ, लातूर वर्ष २५ वे
आदींची सन्मानार्थी म्हणून निवड झाली आहे. पुरस्काराचे स्वरूप सन्मान चिन्ह, मानपत्र आणि धनादेश असे आहे. हा सन्मान सोहळा रविवार, दिनांक ५ ऑक्टोबर २०२५ रोजी यशवंतराव चव्हाण सेंटरच्या मुख्य सभागृहात संपन्न होणार आहे.



















