समृद्धी महामार्गावर खिळे मारलेत गाडीचे टायर पंक्चर झाले आहेत अश्या प्रकारचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यासंदर्भातील खरी माहिती ही आहे 👇
सर्वात आधी तर समृद्धी महामार्गावर मारलेले खिळे नुसन त्याठिकणी इपॉक्सी ग्राऊंटिंग करण्याचे काम चालू आहे. इपॉक्सी ग्राउटिंग म्हणजे
जेंव्हा काँक्रीट रस्त्यावर कधी कधी बारीक किंवा मध्यम भेगा पडतात.
या भेगांमध्ये विशेष केमिकल (Epoxy Resin) इंजेक्शनद्वारे टाकले जाते.
हे औषध दोन मिश्रणाचे असते रेझिन + हार्डनर. मिसळल्यानंतर ते भेगांमध्ये पसरते, आतल्या पोकळ्या भरून काढत कडक होऊन रस्ता पुन्हा पूर्वीसारखा होतो.
इपॉक्सी ग्राऊंटिंग केल्यानंतर रस्त्याचे आयुष्य देखील वाढते.. तरीही नंतर कुणाला असा प्रसंग आढळला तर घाबरून न जाता रोड डायव्हर्जनचे बोर्ड 100 मीटर आधी लावलेली असतात ते पूर्ण वाचून घ्यावे.
ज्यांना ते खिळे वाटत होते त्यांना व ज्यांना माहिती नाहीत त्यांनी देखील ही माहिती वाचावी. ग्राऊंट हे अश्याच पध्दतीने केले जातात. हीच काम करण्याची पद्धत आहे.
1. भेगेवर नोजल बसवली जाते (खिळे नाहीत – Epoxy Injection Nozzles असतात).
2. दोन घटकांचे epoxy resin तयार केले जाते.
3. इंजेक्शन पंपद्वारे भेगेमध्ये हळूहळू इंजेक्ट केले जाते.
4. काही वेळात ते कडक होऊन भेगा पूर्णपणे बंद होतात.
सोप्या भाषेत सांगायचं तर, इपॉक्सी ग्राउटिंग म्हणजे रस्त्याच्या भेगांमध्ये ‘लिक्विड सिमेंट’ भरून त्याला पुन्हा जोडण्याची शस्त्रक्रिया आहे.
अफवांवर विश्वास ठेवू नका..
–



















