Home Uncategorized *राज्य शासनाच्या निर्देशांनुसार आकांक्षी शौचालयांचे बांधकाम अद्यापही स्थगितच*

*राज्य शासनाच्या निर्देशांनुसार आकांक्षी शौचालयांचे बांधकाम अद्यापही स्थगितच*

99
0

*लायन गेटजवळ दोष निर्माण झाल्याने बेस्ट प्रशासनाकडून केबल दुरुस्तीचे काम सुरू*

*समाजमाध्यम आणि प्रसारमाध्यमात प्रसारित वृत्ताच्या अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिकेचे स्पष्टीकरण*

दक्षिण मुंबईतील, शहीद भगतसिंग मार्गावरील लायन गेटजवळ बृहन्मुंबई महानगरपालिकेने आकांक्षी शौचालय बांधकाम पुन्हा सुरू केल्याचा दावा करून पर्यायाने राज्य शासनाच्या स्थगितीचा अवमान झाल्याचा आरोप करणारे वृत्त समाज माध्यम आणि प्रसार माध्यमातून प्रसारित होत आहे. याबाबत बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात येते की, हे वृत्त पूर्णपणे निराधार आणि तथ्यहीन आहे.

यासंदर्भात बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात येत आहे की, केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियान – २ च्या मार्गदर्शक तत्वानुसार, बृहन्मुंबई महानगरपालिकेने लायन गेट येथे आकांक्षी शौचालय प्रस्तावित केले आहे. दरम्यान, माननीय विधानसभा अध्यक्ष महोदय यांनी दिनांक १७ जुलै २०२५ रोजी दिलेल्या निर्देशानुसार, लायन गेट येथील शौचालयाचे बांधकाम बंद ठेवण्यात आले आहे.

तथापि, लायन गेट येथील प्रस्तावित आकांक्षी शौचालयाच्या ठिकाणालगतहून बेस्टच्या केबल जातात. मात्र, या केबलमध्ये दोष (fault) निर्माण झाल्यामुळे सदर दोष दुरुस्त होणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने, सदर ठिकाणी गत २-३ दिवसांपासून बेस्ट प्रशासनाकडून केबल दुरुस्तीचे काम सुरु आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेने याठिकाणी कोणतेही बांधकाम पुन्हा प्रस्ताविलेले अथवा सुरू केलेले नाही. त्यामुळे सध्या समाज माध्यमातून आणि प्रसारमाध्यमातून प्रसारित होणाऱ्या बातम्या निराधार आहेत.”असे महानगरपालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात येत आहे.
***

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here