Home Uncategorized कवी उदय जाधव यांची कविता व्यवस्थेलाच प्रश्न विचारते – प्रेमानंद गज्वी*

कवी उदय जाधव यांची कविता व्यवस्थेलाच प्रश्न विचारते – प्रेमानंद गज्वी*

98
0

 

प्रेमानंद गज्वी यांच्या हस्ते उदय जाधव यांच्या ‘पांढऱ्याशुभ्र स्क्रीनवर’ कवितासंग्रहाचे प्रकाशन

मुंबई
” नाट्यकर्मी व कवी उदय जाधव यांच्या ‘ पांढऱ्याशुभ्र स्क्रीनवर’ काव्यसंग्रहातील कविता समकालातील अनिष्ट गोष्टींवर प्रहार करून व्यवस्थेलाच प्रश्न विचारते.” असे प्रतिपादन प्रख्यात नाटककार तथा कवी प्रेमानंद गज्वी यांनी केले.
दीप तारांगण क्रियेशन्सतर्फे गोरेगावच्या केशवराव गोरे स्मारक सभागृहात गज्वी यांच्या हस्ते ‘पांढऱ्याशुभ्र स्क्रीनवर’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. या पुस्तकावरील चर्चेत कवी सायमन मार्टिन व अजय कांडर तसेच नृत्यांगना मेघा घाडगे आदी सहभागी झाले होते.
कार्यक्रमाला कवयित्री, अभिनेत्री कविता मोरवणकर, दीप तारांगण क्रिएशन संचालक दीपा सावंत खोत उपस्थित होते.
यावेळी प्रेमानंद गज्वी यांनी “आजच्या काळाशी समर्पक अशा कविता या संग्रहातून आपल्यासमोर येतात. आताचा काळ आणि बुद्धतत्त्वज्ञान, आंबेडकरी विचार यांची उत्तम सांगड सदर काव्यसंग्रहातून चित्रित केली आहे.” असेही सांगितले.
सायमन मार्टिन म्हणाले,”उदय जाधव यांच्या कविता खऱ्या अर्थाने स्व अस्तित्वाचा शोध घेणाऱ्या आहेत,कारण एकाच वेळी आत्मलक्षी आणि बाह्यलक्षी आहेत.समाजाची सुखदुःख ,भेदाचा आक्रोश व्यक्त केला आहे.”
अजय कांडर म्हणाले,”उदय जाधव हे मूळचे रंगकर्मी आहेत.चांगला नाट्यलेखक हा चांगला कवी असू शकतो याचे उदाहरण म्हणजे कवी उदय जाधव. काळाचे भान, समकालीन गोष्टी, त्यांचे अंतर्विरोध समजून घेऊन या कविता लिहिलेल्या आहेत. त्यामुळे जाधव यांच्या संग्रहातील कविता खूप पुढे जाणारी आहे. आजचे आजूबाजूचे वातावरण वाचकाला खुणावत अंतर्मुख करते.
मेघा घाडगे म्हणाल्या, “उदय जाधव यांच्या कवितेत सामाजिक वास्तव तीव्रपणे येते. माणूस समजून त्याना जपायला पाहिजे ही भावना हरवल्याने त्या विरोधातील पडसादही या कवितेत उमटतात. ”
यावेळी महादेव जाधव,सुशांत पवार, अमित कांबळे, स्वप्नील जाधव,दीपा सावंत खोत आदिनी कार्यक्रमाच्या प्रारंभी पांढऱ्याशुभ्र स्क्रीनवर काव्यसंग्रहातील काही कवितेचे सादरीकरण तर सूत्रसंचालन कविता मोरवणकर यांनी केले. यावेळी लेखिका रुपाली कुटे, बि. एन. जाधव, दीपक कांबळे, अशोक चाफे,अनिल कदम, लेखक प्रवीण धोपट, वेषभूषाकार मंदार तांडेल आणि देवानंपिय असोक या बहुचर्चित नाटकातील अनेक नाट्यकर्मी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here