Home Uncategorized **गणेशोत्सवात डिजेवर बंदी! उच्च न्यायालयाचा निर्णय कायम!*

**गणेशोत्सवात डिजेवर बंदी! उच्च न्यायालयाचा निर्णय कायम!*

115
0

गणेशोत्सवाच्या तोंडावर मुंबई हायकोर्टाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. मुंबई हायकोर्टाने संपूर्ण मुंबईत डिजेवर बंदी ठेवली आहे. जर कोणीही डीजे चा वापर केला तर मुंबई पोलिसांकडून कारवाई करण्यात येणार आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने ध्वनी प्रदूषणाला आळा बसावा यासाठी डॉल्बी आणि डीजे या सिस्टम वर बंदी आणली होती. तोच निर्णय मुंबई हायकोर्टाकडून आता कायम ठेवण्यात आला आहे. गणेशोत्सव काळात डिजे वाजवणाऱ्या गणेश मंडळांवर मुंबई पोलिसांची नजर असणार आहे. त्याशिवाय, न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केले तर पोलिसांकडून कारवाई करण्यात येणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाने ध्वनी प्रदूषण नियंत्रण आणावे यासाठी अनेक वर्षांपासून डिजे आणि डॉल्बी सिस्टमवर बंदी ठेवली होती. ही बंदी केवळ गणेशोत्सवासाठीच नाही तर इतर सर्व सार्वजनिक मिरवणुका आणि सणांसाठी लागू आहे. यासाठी गणेशोत्सवातही मुंबईत डिजे वाजवण्यास कायद्याकडून परवानगी देण्यात आली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here