Home Uncategorized ‘शासनमान्य वारकरी साहित्य संमेलन’ यावर्षापासून सुरू करणार

‘शासनमान्य वारकरी साहित्य संमेलन’ यावर्षापासून सुरू करणार

71
0

वारकरी परंपरेचं जतन , संवर्धन ही शासनाची जबाबदारी :ना उदय सामंत

“संतांच्या वारशातून प्रेरणा घेऊन आणि तुमच्या आशीर्वादाने, मी उद्योगमंत्री आणि मराठी भाषा मंत्री या दोन्ही भूमिकांमध्ये महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि भाषिक वैभवासाठी कार्यरत राहीन, याचा शब्द देतो.” असे ना. उदयजी सामंत यांनी म्हटले.

‘वारकरी साहित्य परिषदे’ च्या कार्यक्रमाला राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत बोलत होते.
ते पुढे म्हणाले की,

“गेल्या आठ महिन्यांत सर्वाधिक वारकरी कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचं भाग्य मला लाभलं, ही माझ्यासाठी मोठी अभिमानाची बाब आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्याचा प्रस्ताव तयार करण्यापासून ते ज्ञानेश्वरी आणि तुकाराम गाथा घराघरात पोहोचवण्यापर्यंत, सेवा करण्याची संधी मला मिळाली. या परंपरेच्या शक्तीमुळेच आज महाराष्ट्राच्या मातृभाषेला जागतिक पातळीवर मान्यता मिळाली आहे.
वारकरी परंपरेचं जतन आणि संवर्धन ही शासनाची जबाबदारी आहे, आणि म्हणूनच यावर्षीपासून “शासनमान्य वारकरी साहित्य संमेलन” सुरू करण्याची घोषणा केली. पुढील पिढीला वारकरी संप्रदायाची ओळख आणि संस्कार मिळावेत, हीच यामागची भावना आहे.पद्म पुरस्कार समितीवर असताना पहिल्यांदाच मी कीर्तनकार व प्रवचनकारांची नावं सुचवली. कारण हा सन्मान फक्त व्यक्तीचा नाही तर संपूर्ण वारकरी संप्रदायाचा आणि संत परंपरेचा आहे.”असेही ना. सामंत म्हणाले.

या प्रसंगी मंत्री छगन भुजबळ , मंत्री संजय शिरसाट, माजी मंत्री प्रकाश आण्णा आवाडे, शहाजी बापू पाटील यांसह साहित्य परिषदेचे सर्व जेष्ठश्रेष्ठ सहकारी,कीर्तनकार, वारकरी बंधू-भगिनी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here