हडपसर, पुणे
महाराष्ट्र एस. टी. कामगार संघटना आयोजित राज्यव्यापी मेळावा आज हडपसर, पुणे येथे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री ना. उदयजी सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र एस. टी. कामगार संघटना आयोजित “कर्मयोगी हनुमंतराव ताटे अमृतमहोत्सवी गौरव सोहळा आणि राज्यव्यापी कामगार मेळावा” पार पडला.
“एस. टी. महामंडळाच्या शिस्तबद्ध सेवेतील कामगारांचे योगदान हे राज्याच्या सामाजिक-आर्थिक प्रगतीचे एक अविभाज्य अंग आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने कामगारांच्या प्रश्नांवर चर्चा करताना त्यांच्या हितासाठी शासनाच्या वतीने सकारात्मक निर्णय घेण्याचा निर्धार करण्यात आला असून महाराष्ट्राच्या विकासात आपला घाम गाळणाऱ्या सर्व एस. टी. कामगारांना सलाम करतो, असे यावेळी ना. उदयजी सामंत ह्यांनी म्हटले.
या प्रसंगी माजी आमदार रवींद्र धंगेकर यांसह महायुतीचे पदाधिकारी,कार्यकर्ते तसेच संघटेंचे सदस्य आणि हजारोंच्या संख्येने एसटी कर्मचारी उपस्थित होते.


















