मुंबई : ” संजीवनी ममता हॉस्पिटल अॅण्ड रिसर्च सेंटर ” व इंस्पिरा रिअॅलिटी” यांच्या संयुक्त विद्यमाने दि.३० जुलै २०२५ रोजी, ‘महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळा’च्या (एमआयडीसी) अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी एक दिवसीय मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. ●कार्यालयीनस्थळीच आरोग्य सेवा पोहोचविण्याच्या दृष्टीने हे पाऊल अत्यंत महत्त्वाचे ठरले.●
●महामंडळाचा ६३ वा वर्धापन दिन १ ऑगस्ट रोजी साजरा येत आहे.● मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलरासू व सह मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार
यांच्या संकल्पनेतून आयोजित शिबिरादरम्यान रक्तदाब व रक्तातील साखर, तोंडाचा कर्करोग, एआय आधारित थर्मल मॅमोग्राफी, स्तनांचा कर्करोग, गर्भाशय ग्रीवा कर्करोग (पॅप स्मिअर) व सर्वसामान्य आरोग्य तपासणी इ. मोफत आरोग्य तपासण्या करण्यात आल्या.
या शिबिराचे उद्घाटन महामंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी धनंजय सावळकर यांच्याहस्ते करण्यात आले.
यावेळी ‘ममता ग्रुप’चे कार्यकारी संचालक विशाल सारिया, संजीवनी ममता हॉस्पिटलच्या मुख्य कार्यकारी अधिकारी कमलेश सदरंगानी महामंडळाचे महाव्यवस्थापक (मबवि) शरद आचारे, सह मुख्य लेखा अधिकारी अभिजित गुजराथी, प्रशासकीय अधिकारी प्राची मोरे, विधी व्यवस्थापक अखिलेश खराबे, आस्थापना अधिकारी आदिती मांजरेकर, उपव्यवस्थापक उज्ज्वला खरात व इतर अधिकारी वर्ग उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात औपचारिक फित कापून झाली, त्यानंतर कमलेश सदरंगानी यांनी एमआयडीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना हॉस्पिटलच्या आरोग्य सेवा, चालू उपक्रम व आगामी योजना याबाबत सविस्तर माहिती दिली.तसेच ममता ग्रुपचे अध्यक्ष मधुसूदनजी अग्रवाल यांच्या दूरदृष्टीपूर्ण व सेवाभावी नेतृत्वाची ओळख करून देत, त्यांच्या प्रेरणेतून संजीवनी ममता हॉस्पिटलने सर्वसामान्यांसाठी दर्जेदार व परवडणाऱ्या आरोग्य सेवेचा ध्यास घेतला आहे.
या शिबिराचे समन्वयक दीपेन शर्मा यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टर, परिचारिका, पॅरामेडिकल आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने अतिशय नियोजनबद्ध व रुग्ण-केंद्रित पद्धतीने करण्यात आले.
या उपक्रमाला एमआयडीसीच्या कर्मचाऱ्यांचा भरघोस प्रतिसाद मिळाला आणि सर्वस्तरांवरून कौतुक झाले.















