पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी महाविकास आघाडीने पायऱ्यांवर मी मराठीचा गजर केला
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला वंदन विरोधकांनी केले
विधान भवन पायऱ्यांवर माघार सरकार
यू टर्न सरकार अशा घोषणा
हिंदी सक्तीविरोधात मराठी भाषिकांनी एकत्र येण्याची घोषणा करताच महायुती सरकारने हिंदी भाषा सक्तीचा निर्णय मागे घेतला. एकप्रकारे हा मराठी माणसांचा विजय आहे. त्यामुळे आज विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी महाविकास आघाडीने विधिमंडळाच्या पायऱ्यांवर घोषणा देत मराठीचा जागर केला.






















