Home मुंबई पंढरपूर विकास आराखड्यासाठी १५ कोटी मंजूर केल्याबद्दल विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गो-हे...

पंढरपूर विकास आराखड्यासाठी १५ कोटी मंजूर केल्याबद्दल विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गो-हे यांनी शासनाचे मानले हार्दिक आभार

73
0

महाराष्ट्र शासनाने दिनांक 30 जून २०२५ च्या शासन निर्णया नुसार पंढरपूर मंदिर विकास आराखड्यासाठी २०२५-२०२६ या वर्षांमध्ये१५ कोटी एवढा निधी वितरित केला आहे या निधीमधून पंढरपूर मंदिर विकास आराखडा अंतर्गत मंजूर कामावर वर होणारा खर्च करण्यासाठी मोठी संधी मिळालेली आहे. आषाढी वारीच्या काळामध्ये राज्य शासनाने हा निधी वितरित केलेला असल्यामुळे मंदिराच्या विकास कामासाठी मोठीच मदत होणार आहे.
हा निधी वितरित केल्याबद्दल विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे आभार व्यक्त केले आहेत आणि या निधीच्या प्रभावी वापरातून सर्व वारकऱ्यांची यात्रा कालावधीमध्ये अधिकची सोय राज्य शासनामार्फत करण्यात येत आहे, याबद्दल आनंद व्यक्त केला आहे . तसेच सर्व यंत्रणांचे आभार मानले आहेत आणि सर्व वारकऱ्यांना यात्रेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here