Home Uncategorized *”आरक्षण मिळाले म्हणून नव्हे, तर आपल्यामध्ये असलेल्या क्षमतांमुळे आपण पुढे आलो आहोत,...

*”आरक्षण मिळाले म्हणून नव्हे, तर आपल्यामध्ये असलेल्या क्षमतांमुळे आपण पुढे आलो आहोत, हे सिद्ध करणंही तितकंच गरजेचं”- उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे*

86
0

*महिला मेळाव्यात सशक्त नेतृत्व आणि संघटन क्षमतेच्या जोरावर नव्या पर्वाची सुरुवात, डॉ. नीलम गोऱ्हे यांचे स्फूर्तिदायक मार्गदर्शन*

छत्रपती संभाजीनगर, दि. १६ मे – “महिलांनी एकमेकांशी संवाद साधत, आपले विचार प्रगल्भपणे मांडत आणि समाजात ठामपणे उभे राहत नेतृत्व स्वीकारले पाहिजे,” असे प्रतिपादन विधान परिषदेच्या उपसभापती तथा विभागीय संपर्क नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज येथे आयोजित महिला मेळाव्यात केले. छत्रपती संभाजीनगर येथे शिवसेना महिला आघाडीच्या वतीने पार पडलेल्या या मेळाव्यात त्यांनी उपस्थित लाडक्या बहिणींसोबत मनमोकळा संवाद साधला.

या मेळाव्याचे आयोजन छत्रपती संभाजीनगर महिला आघाडीच्या जिल्हा संपर्कप्रमुख सौ. प्रतिभाताई जगताप यांनी केले होते. उपस्थितांना संबोधित करताना डॉ. गोऱ्हे यांनी महिलांच्या आर्थिक, सामाजिक आणि राजकीय सक्षमीकरणाबाबत विविध योजनांची माहिती दिली. “केवळ आरक्षण मिळाले म्हणून नव्हे, तर आपल्यामध्ये असलेल्या क्षमतांमुळे आपण पुढे आलो आहोत, हे सिद्ध करणंही तितकंच गरजेचं आहे,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.

कार्यक्रमादरम्यान त्यांनी बाळासाहेब ठाकरे दवाखान्यांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला आणि काही ठिकाणी अडचणी निर्माण झाल्याचे नमूद करून त्या दूर करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे स्पष्ट केले. तसेच, एक जूनपासून तीस जूनपर्यंत जिल्हाभरात महिलांसाठी आरोग्य शिबिरे राबवण्यात येणार असल्याचे जाहीर करत, प्रत्येक तालुक्यात लोहमार्गाने तपासणीसाठी नियोजन करण्यात यावे असे आवाहन त्यांनी केले.

महिला बचत गटांसाठी उत्पादन विक्रीसाठी बाजारपेठ उपलब्ध करून देण्याबाबतही त्यांनी सांगितले की, उत्पादन पोहोचवण्यापासून ते व्यवसाय निवडीपर्यंत सर्व टप्प्यांवर सरकारतर्फे प्रशिक्षण व सहाय्य दिले जाईल. त्यांनी स्पष्ट केले की महिलांनी एकत्र येऊन आपापसात समन्वय साधून समूह तयार करावेत आणि महानगरपालिकेच्या निवडणुकांत ठामपणे सहभाग नोंदवावा.

*यावेळी महिलांचा मोठ्या संख्येने पक्षप्रवेश डॉक्टर गोऱ्हे यांच्या हस्ते झाला. तसेच दहावी परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थिनींचा गौरवही करण्यात आला.*

या कार्यक्रमास शिवसेना मराठवाडा सचिव अशोक पटवर्धन, सांगली संपर्कप्रमुख सुनीताताई मोरे, छत्रपती संभाजीनगर महिला आघाडी जिल्हाप्रमुख सौ. शिल्पाराणी वाडकर, महानगर प्रमुख सौ. शारदा घुले, ग्रामीण संपर्कप्रमुख कलाताई ओझा, नांदेड संपर्कप्रमुख अंजलीताई मांडवकर व लक्ष्मी नरहिरे ताई, वैजापूर-गंगापूर जिल्हाप्रमुख सुलभाताई भोपळे, पैठण जिल्हाप्रमुख पुष्पाताई गव्हाणे, माजी नगरसेविका सीमाताई खरात, स्वातीताई नागरे, शहर प्रमुख गायत्रीताई पटेल, उपमहानगर प्रमुख सुप्रियाताई व्यवहारे व शिंदे ताई, तालुका प्रमुख शहाणे ताई, उपजिल्हाप्रमुख वनिताताई ठाकूर, संध्याताई जाधव, जयश्रीताई लुंगारे, विधानसभा संघटक राखीताई सुरडकर, सुनील क्षत्रिय आणि अनेक महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

या मेळाव्याने केवळ महिला एकत्र आल्या नाहीत, तर एक सशक्त, सजग आणि संघटित नेतृत्व तयार करण्याची सुरुवात झाली असल्याचे चित्र या संपूर्ण कार्यक्रमातून दिसून आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here