दहा रुपयांचे कॉईन हे वैध चलन आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, स्वतः रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) कडून हे कॉइन पूर्णपणे वैध चलन असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
वास्तविक, आरबीआयने नव्या गाईडलाईन मध्ये हे स्पष्ट केले आहे की, भारतीय चलनातील 1 रुपये, 2 रुपये, 5 रुपये, 10 रुपये आणि 20 रुपयांची नाणी केवळ पूर्णपणे वैध नाहीत तर त्यांचे चलनही पूर्ण वेगाने सुरू आहे.
म्हणजेच या सर्व कॉइन चा व्यवहारांमध्ये वापर होतोय. बँक सुद्धा हे कॉइन स्वीकारत आहेत. मात्र, आरबीआय ने आपल्या नव्या गाईडलाईन मध्ये असे सुद्धा स्पष्ट केले आहे की या नाण्यांचे डिझाइन वेळोवेळी निश्चितपणे बदलले जातात, परंतु ही नाणी पूर्णपणे कायदेशीर आहेत आणि त्यांच्या चलनावर कोणताही परिणाम होणार नाही.
दुसरीकडे, आरबीआयने आतापर्यंत कोणती नाणी चलनातून बाद केली आहेत याची सुद्धा माहिती दिलेली आहे. आरबीआयने आतापर्यंत 25 पैसे आणि त्यापेक्षा कमी किमतीची नाणी चलनातून बाद केलेली आहेत.
पण आता प्रश्न असा उभा राहतो की जर कोणी दहा रुपयांचे नाणे स्वीकारण्यास मनाई केली तर मग अशा परिस्थितीत आपण काय ॲक्शन घेऊ शकतो. दरम्यान आता याचबाबत तज्ञांकडून देण्यात आलेले माहिती आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
दहा रुपयांचे कॉइन एखाद्याने स्वीकारले नाही तर
जर दुकानदाराने किंवा टॅक्सी चालकाने दहा रुपयाचे कॉइन स्वीकारले नाही तर अशावेळी काय केले जाऊ शकते? हा सवाल अनेकांकडून उपस्थित केला जात होता. दरम्यान आता याच संदर्भात तज्ञांकडून मोठी माहिती देण्यात आली आहे.
जे लोक दहा रुपयांचे कॉइन स्वीकारत नसतील त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई केले जाऊ शकते. कारण की चलनातील कॉइन न स्वीकारणे भारतीय दंड संहितेच्या कलम 489 (अ) ते 489 (इ) आणि चलन कायद्यानुसार कायदेशीर गुन्हा मानला जातो.
त्यामुळे जर तुमच्याकडून एखाद्याने दहा रुपयांचे कॉईन स्वीकारले नाही तर तुम्ही याबद्दल स्थानिक पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करू शकता. एवढेच नाही तर, तुम्ही राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण ब्युरोशी देखील संपर्क साधू शकता अशी माहिती जाणकारांकडून यावेळी देण्यात आली आहे.

















