*शाळांची उन्हाळी सुट्टी आणि शाळा १६ जुनला शाळा सुरु करण्याचे परीपत्रक अर्धेकच्चे!*
*राज्यातील ICSE आणिCBSE च्या शाळा सरकारच्या लाडक्या?*
*या शाळातील शिक्षक व विद्यार्थी महाराष्ट्रातले नाहीत का?*
(शीतल हरीष करदेकर)
दि.२९एप्रिल२०२५ ला डॉ. श्रीराम पानझाडे,शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक)शिक्षण संचालनालय म.रा., पुणे.
आणि
शरद गोसावी ,शिक्षण संचालक
(प्राथमिक शिक्षण संचालनालय)
म.रा.
यांच्या सहीने उन्हाळी सुट्टी बाबतचे परिपत्रक शिक्षण विभागाने काढले गेले!त्याच्या अंमलबजावणी साठी ते सर्व संबंधित विभागीय संचालक,शिक्षणाधिकारी,शिक्षण निरिक्षक यांना पाठवण्यात आले.
*राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची सन २०२५ ची उन्हाळी
सुटटी व शैक्षणिक वर्ष २०२५-२६ सुरु करणेबाबतचे हे शासन परिपत्रक मागील शासन परिपत्रक संदर्भासह देण्यात आले आहे.
शासनाने संपूर्ण राज्यातील राज्य मंडळाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या उन्हाळी सुट्टीच्या कालावधीमध्ये एकवाक्यता व सुसंगती आणण्यासाठी
राज्यातील राज्य मंडळाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची सन २०२५ ची उन्हाळी सुट्टी व शैक्षणिक वर्ष
२०२५-२६ सुरु करण्यासाठी पुढीलप्रमाणे सूचना निर्गमित केल्यात
१. राज्यातील राज्य मंडळाच्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना शुक्रवार, दि. ०२ मे २०२५ पासून सुट्टी जाहीर करण्यात येत
आहे.
२. राज्यातील इतर मंडळाच्या शाळा वेळापत्रकानुसार सुरु असल्यास अथवा अशा शाळांमध्ये महत्त्वाचे शैक्षणिक उपक्रम
राबविण्यात येत असल्यास, विद्यार्थ्यांना सुटी जाहीर करण्याबाबत शाळा प्रशासनाने *त्यांच्या स्तरावर उचित निर्णय घ्यावा*.
३. पुढील शैक्षणिक वर्ष सन २०२५-२६ मध्ये विदर्भ वगळता इतर सर्व विभागातील राज्य मंडळाच्या शाळा सोमवार दि. १६जून,२०२५ रोजी सुरु करण्यात याव्यात.
४. जून महिन्यातील विदर्भाचे तापमान विचारात घेता उन्हाळ्याच्या सूट्टीनंतर तेथील राज्य मंडळाच्या शाळा सोमवार, दि. २३
जून, २०२५ ते २८जुन २०२५ पर्यंत सकाळ सत्रात ७.०० ते ११.४५यावेळेत सुरु करण्यात याव्यात. सोमवार
दि.३०.०६.२०२५ पासून नियमित वेळेत सुरु करण्यात याव्यात.
वरील सूचना आपल्या अधिनस्थ सर्व मान्यता प्राप्त राज्य मंडळाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या
निदर्शनास आणून द्याव्यात.
हे परीपत्रक आपल्या अधिनस्त फक्त राज्य मंडळाच्या शाळांना हा नियम लागू होते.तर मग राज्यातील ICSE आणिCBSE बोर्डांच्या शाळांना लागू होतात की नाही?
*याच शाळा आपली मराठी भाषा द्वितीय भाषा म्हणून शिकवत नाहीत.तिला ग्रेडडे म्हणून राबवतात. अशा शाळांना रेड कार्पेट कशासाठी?*
*राज्यातील इतर शाळा राज्यसरकारच्या आदेशानुसार मे महिन्यात सुट्टी आणि जुनला शाळा उघडण्याचे काम करणार,मग ICSE आणि CBSE ही विशेष अशा कोणत्या दर्जाने काम करतात?*
*ICSE आणि CBSE बोर्डाच्या शाळांना त्या- त्या राज्याच्या सर्व नियम लागू असताना; या शाळा महाराष्ट्र राज्यात सर्व सवलती मदत घेऊन महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण विभागाचे GR, परिपत्रकाचे पालन का करीत नाहीत. यामागे काय गौडबंगाल काय आहे?*
*महाराष्ट्र राज्यातील सर्व शाळांच्या सुट्ट्यामध्ये सुसूत्रता का नाही?*
*१६जून पर्यंत उन्हाळी सुट्ट्या सुरू असताना या शाळा २ जूनला सुरू करून परीक्षा कशा घेत आहेत?*
*मुंबईचे या शाळांतील विद्यार्थी महाराष्ट्रातच आहेत ना?*
एकाला एक नि दुसऱ्याला एक न्याय ,हे धोरण म्हणजे शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांवरही अन्याय आहे की नाही?
*शिक्षण विभाग झोपेचे सोंग घेत आहे.*
असे असे का घडते आहे यावर
शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी तातडीने लक्ष घालून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी.
*सर्व शाळा विदर्भ वगळता एकाच वेळी सुरू का होत नाहीत?*
ICSE आणि CBSE बोर्डाच्या शाळा या केंद्राच्या देशाच्या लाडक्या आणि
या इतर बोर्डाच्या शाळा मंगळ ग्रहावरच्या आहेत का?
*या शाळांत सुट्ट्यांमध्ये कोणते शैक्षणिक काम सुरू आहे?*
इथे महत्त्वाचे शैक्षणिक काम दाखवलं जात़ ते नक्की कोणते?
या शैक्षणिक कामाच्या नावाखाली विद्यार्थ्यांची हक्काची सुट्टी का कमी करीत आहेत?
आणि महत्वाचे म्हणजे
*या शाळा सुरू झाल्याबरोबर परीक्षा कसल्या घेत आहेत?*
*यांच्यावर कुणाचा काही वचक आहे की नाही?*
या शाळांचे सुट्ट्यांमध्ये परीक्षा घेण्याचे उद्योग तात्काळ बंद करायला हवेत आणि सर्व शाळा १६ जूनलाच उघडल्या पाहिजेत असे पालक आणि शिक्षकही म्हणत आहेत,पण आपल्या मुलांचे भविष्य आणि नोकरीची चिंता म्हणून उघडपणे कुणी बोलत नाहीत!
सरकार.,महत्त्वाचा प्रश्न असा की, या सुट्ट्यांमध्ये सुसूत्रता का नाही?
हे परिपत्रक असे तयार का केले गेले ज्यात या शाळांना अलगद बाजूला ठेवले आहे.?
या शाळा महाराष्ट्रात, मुंबईत आहेत तर मग त्यांना एक न्याय आणि राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना एक असे का होत आहे याची जोरदार चर्चा सुरु आहे.
*या शाळांना ही अशी मुभा का देत आहेत?*
*या बोर्डाच्या शाळांनी त्या त्या राज्याचे नियम पाळणे बंधनकारक आहे?*
*असे असताना त्यांच्या वर अशी मेहेरबानी का? कोण कोणाची मर्जी राखत तर नाही ना?*
असे अनेक प्रश्न उभे आहेत!
महाराष्ट्रात या शाळांनी महाराष्ट्राचे नियम पाळायला हवेतच आणि सर्वसमावेशक सुट्टि व शाळा उघण्याचे परिपत्रक काढायला हवे.



















