कोल्हापुरात भरारी पथकाकडून रोख रक्कम जप्त
कोल्हापूर, : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने ४७-कोल्हापूर लोकसभा मतदार संघ अंतर्गत २७४- कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदार संघात स्थिर सर्वेक्षण पथकाने कळंबा नाका येथील चेकपोस्टवर स्थिर सर्वेक्षण पथक क्र ११, पथक प्रमुख एस आर कुंभार यांनी दि १२ एप्रिल २०२४ रोजी वाहन तपासणी दरम्यान कळंबा नाका तर्फे ठाणे याठिकाणी महिंद्रा बोलेरो न्यू गाडी RJ15UK0253 मधून रोख रक्कम रुपये २० लाख पंचनामा करुन जप्त केली आहे.
ही रक्कम बँक अधिकारी यांच्याकडून मोजली असता २० लाख रुपये असल्याचे आढळून आले. या रकमेबाबत सुरेश कुमार रामेश्वर लाल यांचा जबाब घेतला असता त्यांनी ते आरआरएसएम इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड जयपुर, राजस्थान या कंपनीमध्ये सुपरवायझर चे काम करत असल्याचे सांगितले. ही रक्कम सध्या अंबोली संकेश्वर तसेच पेठ नाका सांगली या ठिकाणी रस्त्याचे काम चालू असून त्या कामा संदर्भात कामगाराचे पगार देण्याबाबत नेत असल्याचे जबाबामध्ये नमुद केले आहे. ही रक्कम पेटीत सिलबंद करुन जिल्हाधिकारी कोषागार कार्यालय येथे जमा करण्यात आली असल्याची माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकारी हरिष धार्मिक यांनी दिली आहे.


















