Home पालघर-ठाणे / नवी मुंबई / रायगड / रत्नागिरी / सिंधुदुर्ग *भाजपा आ. प्रविण दरेकरांच्या उपस्थितीत उद्या* *महाडमधील विविध विकास कामांचा शुभारंभ*

*भाजपा आ. प्रविण दरेकरांच्या उपस्थितीत उद्या* *महाडमधील विविध विकास कामांचा शुभारंभ*

133
0

*झंजावती दौऱ्यात खा. धैर्यशील पाटील, आ. चित्रा*

*वाघ, आ. निरंजन डावखरेही राहणार उपस्थित*

मुंबई – भाजपा महाड विधानसभा १९४ च्या वतीने शहरातील विविध विकास कामांचा शुभारंभ, पक्षप्रवेश आणि बैठका भाजपा विधानपरिषद गटनेते आ. प्रविण दरेकर यांच्या उपस्थितीत मंगळवार १ एप्रिल, २०२५ रोजी पार पडणार आहे. या झंजावती दौऱ्यात खासदार व रायगडचे जिल्हा अध्यक्ष धैर्यशील पाटील, आ. चित्रा वाघ आणि आ. निरंजन डावखरे यांचीही प्रमुख उपस्थिती असणार आहे.

या दौऱ्यात सकाळी ११ वाजता पोलादपूर येथील श्री. गोविंद चोरगे सावित्री ड्रिंकिंग वॉटरचे उदघाटन करण्यात येणार आहे. तसेच दुपारी ३ वाजता मु. पो. पडवी येथे बस थांब्याचे उदघाटन, दुपारी ३.३० वा. मु. पो. गावडी येथे धोबीघाटाचे भूमिपूजन व पक्ष प्रवेश, सायंकाळी ४ वा. श्री सोमजाई सभामंडप, भक्तनिवास व सुशोभीकरणाचे भूमिपूजन, सायं. ६ वा. करंजखोल पोटसुरे आळी येथील महिला व पुरुष यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी अशोक रेसिडेन्सी येथे बैठक, सायं. ६.३० वा. करंजखोल दत्तआळी येथील रस्त्याचे भूमिपूजन आणि करंजखोल शिगवण वाडी येथे पक्षप्रवेश, रस्त्याचे भूमिपूजन व पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनचे उदघाटन पार पडणार आहे, अशी माहिती भाजपा दक्षिण रायगड जिल्हा सरचिटणीस बिपीन महामुणकर यांनी दिली.

याप्रसंगी दक्षिण रायगड महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा मंजुषा कुद्रीमोती, महाड तालुका मंडल अध्यक्ष निलेश देवगिरकर, दक्षिण रायगड उपाध्यक्ष जयंत दळवी, दक्षिण रायगड महिला मोर्चाच्या सरचिटणीस नीलिमा भोसले, उपाध्यक्षा रश्मी वाझे, दक्षिण रायगड कार्यकारिणी सदस्य सुधीर महाडिक, संदीप ठोंबरे, अजेय जोगळेकर, योगेश झांडे, महाड शहर अध्यक्ष निलेश तळवटकर, महाड शहर महिला अध्यक्षा नमिता दोशी, महिला मोर्चा तालुकाध्यक्षा मंजुषा जोशी, चांभारखिंड ग्रामपंचायतचे सरपंच सुहास कुडपाने, महाड तालुका सरचिटणीस विठ्ठल घाग, प्रभाकर झांजे, विकास दरेकर, रविंद्र सागवेकर यांसह शक्ती प्रमुख, सुपर वॉरियर, बूथ अध्यक्ष, सर्व सेलचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

00000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here