Home Uncategorized “चला उल्हास नदी वाचवू या”

“चला उल्हास नदी वाचवू या”

78
0

PLS SAVE ULHAS RIVER …

गेल्या 8 वर्षांपासून उल्हास नदी प्रदूषणमुक्त व्हावी , आम्हाला पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळावे म्हणून आम्ही अनेक आंदोलने केलीत परंतु प्रत्येकवेळी शासन व प्रशासनाने लेखी व तोंडी आश्वासने देऊन आमची फसवणूकच केली आहे …

परंतु आम्ही खचून न जाता आमची लढाई ही सुरुच ठेवणार आहोत …

22 मार्च , जागतिक जलदिन …

त्यामुळेच 22 मार्च 2025 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून शासन व प्रशासनाचा निषेध म्हणून स्वतःचे मुंडन करून आंदोलनाला सुरुवात होणार आहे …

कार्यालयीन वेळेत दररोज उल्हास नदीच्या दूषित पाण्यात , जलपर्णीमध्ये उभे राहून बेमुदत हे आंदोलन केले जाणार आहे …

ठाणे जिल्ह्यातील जवळपास 80 ते 90 लाख लोक आजही उल्हास नदीतील सांडपाणी पीत आहेत , या दूषित पाण्यामुळेच नागरिक मोठ्या प्रमाणावर आजारी पडत आहेत …

आपला हा लढा आपल्या मूलभूत हक्कासाठी आहे …

आपल्यासाठी व आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी उल्हास नदी वाचविणे हे आपले सामाजिक कर्तव्य आहे हे ध्यानात ठेऊन ज्यांना शक्य असेल त्यांनी या लढ्यात सामील व्हावे …🙏

आमच्या प्रमुख मागण्या ….

1 ) उल्हास नदीत लागणारे सर्व प्रदूषित सांडपाण्याचे नाले हे तातडीने बंद व्हावेत …
2 ) उल्हास नदी जलपर्णीमुक्त व्हावी …

3 ) मोहोने बंधाऱ्याच्या काही मीटर अंतरावर अगोदर एक नवीन बंधारा बांधण्यात यावा व सद्यस्थितीत असलेल्या मोहोने बंधाऱ्याजवळ सांडपाण्याचा मैला व अशुद्ध केमिकलयुक्त गाळ काढण्यात यावा …

4) दूषित उल्हास नदीचे अतिरिक्त पाणी मराठवाड्याला देण्यासाठी कोणतीही योजना असेल तर ती रद्द करावी …
( आपल्याकडेच भीषण पाणीटंचाई आहे त्यातही पाण्यासरखा धर्म नाही परंतु कुणाला पाणी द्यायचेच असेल तर शुद्ध पाणी द्यायला हवे )

” जल है तो कल है ” …

नितीन सुमन महारु निकम
मा. नगरसेवक ( जायंट किलर )
अध्यक्ष :- मी कल्याणकर सामाजिक संस्था

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here