Home महाराष्ट्र शिरोळ तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटीबध्द – माधवराव घाटगे

शिरोळ तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटीबध्द – माधवराव घाटगे

213
0

शिरोळ तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटीबध्द – माधवराव घाटगे

१३ कोटी रूपयांच्या रस्ते कामाचे उदघाटन

शिरोळ / प्रतिनिधी

     शिरोळ तालुका हा सधन तालुका म्हणून ओळखला जातो. तालुक्यातील प्रत्येक गावांमध्ये रस्ता,गटर्स या सारख्या पायाभूत सुविधा देणे गरजेचे आहे. त्यासाठी गुरूदत्त शुगर्स च्या माध्यमातून शासन स्तरावर पाठपुरावा करित असून,शिरोळ तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटीबध्द असल्याचे प्रतिपादन श्री गुरूदत्त शुगर्स चे चेअरमन व कार्यकारी संचालक माधवराव घाटगे यांनी केले.चिंचवाड व टाकळीवाडी- अकिवाट येथिल १३ कोटी रूपयांच्या रस्ता रुंदीकरण कामाच्या शुभारंभ कार्यक्रम प्रंसगी ते बोलत होते.

यावेळी बोलताना घाटगे म्हणाले राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण व वस्त्रोद्योगमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या सहकार्यातून नवीन मंजूर झालेला प्रमुख जिल्हा मार्ग (MDR) क्र.१२३ मधील चिंचवाड ते दत्त कारखाना पहिला स्टॉप या मार्गावरील ५.५ कि.मी रस्त्याच्या रूंदीकरणासाठी ८ कोटी रूपये तसेच अकिवाटटेक ते बाळूमामा मंदिर कमानीपर्यंत २.५ कि.मी रस्त्याचे रुंदीकरणासाठी ५ कोटी असे एकूण १३ कोटी रुपयांच्या निधी प्राप्त झाला असून त्याचा शुभारंभ विविध मान्यवरांच्या हस्ते आज करण्यात आला आहे. ऊस हंगाम सुरू झाल्यानंतर व इतर वेळी रस्त्यावरील होणारी वाहनाची वर्दळ, अवजड व इतर वाहनांची वाढलेली संख्या लक्षात घेता मोठ्या रस्त्यांची गरज यामुळे पूर्ण होणार आहे.

घाटगे म्हणाले, शिरोळ तालुक्यात नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या माध्यमातून आतापर्यंत ६२ कोटी रूपयांची विकासकामे केली आहेत. पण आम्ही मंजूर केलेली विकास कामाचे श्रेय दुसरे कोण तरी घेत असेल तर मी गप्प बसणार नाही. ज्यांनी काम मंजूर करण्यासाठी प्रयत्न केले त्यालाच त्या कामाचे श्रेय दिले पाहिजे. न केलेल्या कामाचे श्रेय कोणी लाटण्याचे प्रयत्न केल्यास त्यांची योग्य वेळी दखल घेतली जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here