* मीरा भाईंदर शहरातील
मेट्रो मार्ग-९ लगत तयार करण्यात आलेल्या उड्डाणपुल क्र.२ चे लोकार्पण आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते संपन्न झाले
हा उ
ड्डाणपूल एस स्टोन जंक्शन जवळील साई बाबा नगर मेट्रो स्थानाकापासून सुरु होऊन शिवार गार्डन पर्यंत असेल. या नवीन पुलामुळे वाहतूक कोंडी कमी होणार असून स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, आमदार नरेंद्र मेहता, मीरा भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त राधामोहन शर्मा, ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे आणि मीरा भाईंदर येथील महायुतीचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


















