Home पत्रकारवार्ता - माई पत्रकार महामंडळ कुणी लटकवले?*तरुणाईने ,६०,५०शीच्या आतल्या मीडीयाकर्मीने सन्मानाने जगण्यासाठी कामगार कायद्याची साथ...

पत्रकार महामंडळ कुणी लटकवले?*तरुणाईने ,६०,५०शीच्या आतल्या मीडीयाकर्मीने सन्मानाने जगण्यासाठी कामगार कायद्याची साथ हवी-शीतल करदेकर

369
0

*आमरण उपोषणाला किंमत नाही, पत्रकार बहिणीला भाऊ विचारत नाहीत*
*सरकारला महामंडळ करायचे नाही! खिल्ली उडवताय सच्चा पत्रकार महिलेची?*
*आज मी अन्नत्याग करते … माझी लढाई सुरु!*
* महामंडळाचे.फसवे आश्वासनं,फसवा कारभार! …?*

*शून्य किंमत असलेले भिकारी आहोत का आम्ही?*
*चौथा स्तंभ …बेकार , जगण्यात किमान सन्मान नाही,*
*तरुणाईने ,६०,५०शीच्या आतल्या मीडीयाकर्मीने* *सन्मानाने जगण्यासाठी कामगार कायद्याची साथ हवी*तीच जर सरकार देत नसेल तर कसं काय समाज हितासाठी काम करतील ?

पत्रकारांशी असे वागत असाल ,आमच्याकडे दुर्लक्ष करत असाल,तर ही आई भवानीची लेक या अन्याया विरोधात लढेल!… आमच्या क्षेत्रात सन्मानाने काम करायचं तर आम्हाला सर्वप्रकारची सुरक्षा हवी…आर्थिक सामाजिक राजकीय!

*वाळव्याच्या क्रांतिसिहांच्या मातीतली लेक आहे ९६ कुळी!*
*लढणाऱ्या भंढाऱ्याच्या कुळाची सून आहे मी!*
*आणि कर्माने वासुदेवा ची कुळी जपणारी, लढाऊ क्षत्रीय ब्राह्मण आहे मी…माझी लढाई अधर्माविरोधात!*

*राजधर्माचे पालन न करणाऱ्यांविरोधात*

*ज्या पत्रकारांना वाटतं मी बोलते ते खरं आहे, त्यांनी आमच्या सोबत यावं ,ज्यांना वाटतं मी वेडी आहे त्यांनी* *खुशाल दगड चिखल मारावेत, ही जन्मसावित्री या साठी तयार आहे!*
*हिंदु ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि आचार्य अत्रेची निर्भिड शैली आहे

*शीतल हरीष रामचंद्र करदेकर*
संस्थापक अध्यक्ष
*मीडिया असोशिएशन ऑफ इंडिया*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here