Home Trending Now माहिती आणि जनसंपर्क खात्यातील तीन गुन्ह्यांची माहिती! प्रशांत आष्टीकरांची कारवाईची मागणी!...

माहिती आणि जनसंपर्क खात्यातील तीन गुन्ह्यांची माहिती! प्रशांत आष्टीकरांची कारवाईची मागणी! सरकारच्या समित्यांत अशा लोकांना आजवर मिळालेले स्थान चोरांच्या हाती तिजोरी ची चावी .. चौथ्या स्तंभाचा अपमान- शीतल करदेकर

275
0

माहिती आणि जनसंपर्क खात्यातील तीन गुन्हे उघडकीस!

तातडीने चौकशी  व्हावी , गुन्हेगारांवर कारवाई व्हावी – व्यंगचित्रकार प्रशांत  आष्टीकर

गुन्हा  क्र.१
हायकोर्टाने अ. भा. मराठी पत्रकार परिषदेवर २००२ साली प्रशासक बसवलेला असतानाही ,२०२३ मध्ये परिषदेचा एस. एम. देशमुख ह्याचे १६ आणि त्याला विरोध न करणारे बाकी पत्रकार ह्यांची अधीस्वीकृती समिती जाहीर केली!
शासनाची २३ वर्षापासून फसवणूक करणारा एस. एम. देशमुख आणि यदू जोशी यांनाआजपर्यंत अटक नाही

गुन्हा नं २
अंदाजे दोनशे कोटीची संपती असलेल्या पत्रकाराला शासनाने पत्रकार पेंशन लागू केली आहे. मनमाड चा पत्रकार नरेश गुजराती याला बेकायदेशीर पेंशन मंजूर करणारा पत्रकार पेंशन योजनेचा अध्यक्ष राजा माने जाकीटवाला याच्यावर कारवाही नाही.
नरेश गुजराती याच्या घरात प्रत्येकाला अधिस्वीकृती कार्ड होते हा इतिहास शासनाच्या दप्तरात आहे

गुन्हा नं ३ –                                                            सातारा येथील कुख्यात खंडणीखोर पत्रकार हरीश पाटणे (दै पुढारी ) याने नगरपालिकेच्या ग्रंथालयाची इमारत हडपण्याचा प्रयत्न चालवला आहे. रात्री ह्या इमारतीत गैर कृत्ये चालू आहेत ,शासन गप्प आहे.

माहिती जनसंपर्क खात्याचे प्रभारी (IPS) ब्रिजेश सिंह असून हे देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आहेत, हे खाते मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे आहे.या प्रकरणाची चौकशी लावून आरोपींना अटक करावी.
शासनाने कानाडोळा करू नये.
फडणवीस यांनी माहिती आयुक्त पदी नेमलेल्या दिलीप धारूरकरची आम्ही चौकशी लावल्यानंतर धारूरकरच्या अंत्यसंस्काराला फडणवीस गेले नाहीत असेही आष्टीकर यांनी यात नमुद केले आहे.

या प्रकरणाची तातडीने चौकशी  व्हावी , गुन्हेगारांवर कारवाई व्हावी अशी मागणी व्यंगचित्रकार प्रशांत पद्माकर आष्टीकर यांनी मुख्यमंत्री व संबंधित विभागाचे मंत्री ना देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे केली आहे

या अत्यंत गंभीर विषयाने महाराष्ट्रातील पत्रकार क्षेत्रात खळबळ माजली आहे.

एकूणच प्रकरण भयंकर असून महाराष्ट्रातील समस्त माध्यम कर्मींवर  व त्यांच्या हक्कावर अन्यायकारक असा मोठं मीडियास्कॅम आहे. अशी जोरदार चर्चा सर्वत्र सुरु झाली आहे.

“सरकारच्या समित्यांत अशा लोकांना आजवर मिळालेले स्थान चोरांच्या हाती तिजोरी ची चावी असा प्रकार व चौथ्या स्तंभाचा अपमान आहे” – शीतल करदेकर -संस्थापक अध्यक्ष ,मीडिया असोशिएशन ऑफ इंडिया ,प्रो. माईमीडिया२४

अधिक माहिती साठी ★*प्रशांत आष्टीकर*
व्यंगचित्रकार, मुबई
मोबाईल – ७३८७४६२२६९
EMAIL ID : prashantashtikar1966@gmail.co

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here