Home पुणे *कुमार रंगकर्मी पुरस्कार प्रदान*

*कुमार रंगकर्मी पुरस्कार प्रदान*

191
0

*कुमार रंगकर्मी पुरस्कार प्रदान*
प्रा.देवदत्त पाठक संशोधित शाळेच्या अभ्यासक्रमात नाटकाचा तास अंतर्गत गेल्या ३८वर्षापासून सुरू असलेल्या या प्रकल्पातील या पुरस्कार वितरणामध्ये यावर्षी एस एन टी कन्या शाळा, माटे हायस्कूल ,तसेच ज्ञानदा प्रशाला या शाळेतील विद्यार्थ्यांना यावर्षीचा कुमार रंगकर्मी पुरस्कार दिला गेला.रंगमंच खेळातून ८० तासिकांच्या माध्यमातून मुलांचे व्यक्तिमत्व व क्षमताविकसन आणि कलात्मक अभिव्यक्ती यातील सर्वोत्तम प्रगती दाखवणाऱ्या शालेय विद्यार्थ्यानां सर्वोत्कृष्ट कुमार रंगकर्मी पुरस्कार दिला जातो. यावर्षी तो आर्यन तोलनूर अदिती पोपलभट,रिया येरडकर ,खुशी घोलप ,प्रतीक चव्हाण अनन्या जगताप यांना अनुक्रमे ज्ञानदा प्रशाला किरकट वाडी एसएनडीटी कन्या शाळा पुणे , व्ही के माटे हायस्कूल चिंचवड या शाळेतील विद्यार्थ्यांना देण्यात आला. गुरुस्कूल फाउंडेशन गुफान तसंच रोटरी क्लब पुणे च्या सहकार्याने अमित भदे ,हेमंत जेरे ,दीपा पानसे, प्राजक्ता जेरे ,लिंबराज खुने ,दीपक परदेशी ,देवदत्त पाठक आणि मिलिंद केळकर यांच्या हस्ते देण्यात आला.
कुमार रंगकर्मी पुरस्काराचे हे पंचविसावे वर्ष आहे १९८७ पासून सुरू असलेल्या शाळेच्या अभ्यासक्रमात नाटकाचा तास च्या अंतर्गत ३७१ शाळांचा यामध्ये आजपर्यंत सहभाग आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here