Home Uncategorized सांस्कृतिक आणि मनोरंजन क्षेत्रातील पत्रकारांच्या प्रश्नांबाबत सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांना मीडिया...

सांस्कृतिक आणि मनोरंजन क्षेत्रातील पत्रकारांच्या प्रश्नांबाबत सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांना मीडिया असोशिएशन ऑफ इंडियाचे निवेदन

187
0

*सांस्कृतिक आणि मनोरंजन क्षेत्रातील पत्रकारांच्या प्रश्नांबाबत सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांना निवेदन देताना मीडिया असोशिएशन ऑफ इंडिया ( माई मीडिया)च्या संस्थापक अध्यक्ष शीतलताई करदेकर, संघटन सचिव, मुंबई सचिन चिटणीस कोषाध्यक्ष चेतन काशीकर व मंदार जोशी*(छायाचित्रात)

प्रति,
मा.ना.श्री आशिष शेलारसाहेब,
सांस्कृतिक मंत्री, महाराष्ट्र राज्य

विषय: मनोरंजन व सांस्कृतिक क्षेत्रातील माध्यमकर्मींच्या सक्षमीकरण व सन्मानासाठी सहकार्य करणेबाबत

महोदय ,नमस्कार!

मुंबई ही आर्थिक तसेच ग्लॅमरस जगाची राजधानी! इथे राजकारण ,समाजकारण याबरोबरच चित्रपट,नाटक ,साहित्य यांची मोठ्या प्रमाणात घडामोडी व आर्थिक उलाढाल होते.
प्रसार माध्यमे व या क्षेत्रातील माध्यमकर्मी यात मोलाची भूमिका निभावतात.
मात्र त्यामानाने या क्षेत्रातील पत्रकार दुर्लक्षित रहातात
ही अत्यंत चिंतनीय बाब आहे.

आपण अभ्यासू व नवीन तसेच भरीव कामात पुढाकार घेणारे मंत्री म्हणून, आमच्या प्रश्नांवर संवेदनशीलपणे नियोजनबध्द कार्यवाही कराल हा विश्वास आहे.
म्हणून हे निवेदन देत आहोत.

 

१)मनोरंजन क्षेत्रात ५ वर्षाहून अधिक काम करणा-या पत्रकार व इतर माध्यमकर्मींची, नोंद माहिती व जनसंपर्क महासंचालनाकडे आणि विधान भवनाकडे व्हावी.
२) या क्षेत्रातील माध्यमकर्मींना मंत्रालय व विधानभवनात अधिस्विकृती प्रमाणे व्दैवार्षिक प्रवेश पास देण्यात यावा.
३)१५ वर्षाहून अधिक वर्ष कार्यरत अशा पत्रकार माध्यमकर्मींना अधिस्विकृती पत्र देण्यात यावे
४)अधिस्विकृती समितीवर राज्य पातळीवर ५ व जिल्हा पातळीवर महसुलवार प्रत्येकी २सदस्य मीडिया असोशिएशन ऑफ इंडिया च्या माध्यमातून घेण्यात यावेत.
५)सरकारच्या विविध सांस्कृतिक आणि अनुदान समितीमध्ये या क्षेत्रातील कमीत कमी दोन पत्रकारांचा समावेश करण्यात यावा
६)बरेचसे पत्रकार मुंबईबाहेर राहात आहेत. त्यांना मुंबईत सरकारी कोट्यातून घर किंवा एखादा भूखंड उपलब्ध करून देण्यात यावा
७)अटलसेतू च्या नवी मुंबई आसपास भुखंड द्यावा .
८)राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यात, इतर सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सरकारतर्फे आमंत्रण देणे
९)मनोरंजन क्षेत्रात काम करणाऱ्या पत्रकारांसाठी विशेष पुरस्काराचे नियोजन करून या अभ्यासकांना गौरविण्यात यावे
१०) सांस्कृतिक धोरणात मनोरंजन -सांस्कृतिक क्षेत्रातील पत्रकारांसाठी विशेष आर्थिक व सुविधांसाठी नियोजन असायला हवे .
या विषयी आपण ठोस भूमिका घेऊन या क्षेत्रातील पत्रकारांना उचित सन्मान द्यावा ही विनंती.

शीतल करदेकर
संस्थापक अध्यक्ष
मीडिया असोशिएशन ऑफ इंडिया

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here