Home Uncategorized परभणीत दरोडा टाकून महिलेवर सामुहिक अत्याचार केलेल्या घटनेतील आरोपींना तत्काळ अटक करावी”;...

परभणीत दरोडा टाकून महिलेवर सामुहिक अत्याचार केलेल्या घटनेतील आरोपींना तत्काळ अटक करावी”; उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या सूचना* *पीडित महिलेचे व कुटुंबाचे समुपदेशन करण्यात यावे… डॉ. गोऱ्हे*

116
0

*”परभणीत दरोडा टाकून महिलेवर सामुहक  अत्याचाराच्या  घटनेतील आरोपींना तत्काळ अटक करावी”; उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या सूचना*

*पीडित महिलेचे व कुटुंबाचे समुपदेशन करण्यात यावे… डॉ. गोऱ्हे*

परभणी : परभणी येथे दिनांक ३ जानेवारीच्या पहाटे चोरट्यांनी सशस्त्र दरोडा टाकला. यावेळी अतिशय भयंकर आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली. तिथे वास्तव्यास असलेल्या कुटुंबातील एका शेतमजूर महिलेवर काही नराधमांनी सामुहिक अत्याचार केला. यावेळी धारदार शस्त्राने हल्ला केल्याने कुटुंबातील तीन सदस्य जखमी झाले असून एकाची प्रकृती गंभीर आहे. याची विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोर्हे यांनी गंभीर दखल घेतली . याबाबत त्यांनी आज पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला आणि या घटनेत आरोपींना कठोर शिक्षा केली जाईल याबाबत सूचना केल्या.

याप्रकरणी सूचना करताना डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले की, “साक्षीदार संरक्षण कायद्याच्या अंतर्गत पीडित कुटुंबाला संरक्षण दिले जावे आणि पीडित कुटुंबाला सामाजिक दृष्टिकोनातून त्रास होत असले तर, त्यांना निकाल लागेपर्यंत दुसऱ्या ठिकाणी निवासाची आणि उदरनिर्वाहाची व्यवस्था करावी. आरोपींना तत्काळ अटक करावी.

पीडित महिला व कुटुंबाचे समुपदेशन करण्यात यावे आणि पीडित महिलेला कौटुंबिक त्रास होणार नाही, यासाठी खास लक्ष देण्याच्या सूचना देखील त्यांनी यावेळी दिल्या. मनोधैर्य योजनेचा प्रस्ताव तत्काळ तयार करून संबंधित अधिकाऱ्यांना सादर करावा आणि त्याला तत्काळ मान्यता कशी मिळेल यासाठी पाठपुरावा करावा. या घटनेत विशेष सरकार वकील नेमत असताना, पूर्वी ज्या वकिलांनी दोषसिद्धी मिळाली आहे त्यांना प्राधान्य देण्यात यावे.

महिलेची वैद्यकीय तपासणी देखील करून घेण्यात यावी, अशा महत्त्वाच्या सूचना डॉ. नीलम गोऱ्हे यांनी यावेळी पोलीस अधीक्षक रविंद्र परदेशी यांना केल्या. या सूचनांचा परदेशी यांनी स्वीकार केला असून तत्काळ कार्यवाही करण्याची ग्वाही दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here