Home Uncategorized कामगार आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य (वांद्रे) कार्यालयाच्या* वतीने *इमारत व इतर बांधकाम कामगार...

कामगार आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य (वांद्रे) कार्यालयाच्या* वतीने *इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळ, बाल कामगार व असंघटीत कामगारांसाठी कॅम्पचे आयोजन

296
0

दिनांक ०६ डिसेंबर रोजी *डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमी, दादर* येथे अभिवादन करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून लाखो अनुयायी येत असतात.

या दिवसाच्या निमित्ताने *कामगार आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य (वांद्रे) कार्यालयाच्या* वतीने *इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळ, बाल कामगार व असंघटीत कामगार* यांच्या विविध योजनांची माहिती (बांधकाम कामगार नोंदणी, नूतनीकरण, शैक्षणिक, सामाजिक, आरोग्यविषयक, आर्थिक मदत इत्यादी. बाल कामगार प्रथेविरुद्ध जनजागृती, ई श्रम नोंदणी, ) लोकांपर्यंत पोचाविण्याकरिता कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे.

सन २०१७ पासून अशा मार्गदर्शन कैम्प चे आयोजन करुन  तेथे आलेल्या लोकांना मार्गदर्शन करण्यात येते. यावर्षीही सदर कॅम्पचे आयोजन करण्यात आलेले आहे.


तरी सर्वांना विनंती करण्यात येते की, या आयोजित केलेल्या या कार्यालयाच्या कॅम्पला अवश्य भेट द्या.असे आवाहन कामगार आयुक्तालय (वांद्रे) च्या  वतीने करण्यात आले आहे.

*कार्यक्रमाचे स्थळ -* स्टॉल क्रमांक ३५६, चैत्यभूमी, शिवाजी पार्क,दादर
*दिनांक*-०६.१२.२०२४
*वेळ*- सकाळी १० ते संध्याकाळी ५:३० वाजेपर्यंत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here