Home Uncategorized बेस्टच्या निवासी ग्राहकांस अदानीचे नवीन विद्युत स्मार्ट मीटर लावण्यास तात्काळ स्थगिती द्यावी...

बेस्टच्या निवासी ग्राहकांस अदानीचे नवीन विद्युत स्मार्ट मीटर लावण्यास तात्काळ स्थगिती द्यावी …. (उध्दव बाळासाहेब ठाकरे) गटाचे माजी आमदार  दगडु दादा सकपाळ यांचा बेस्ट प्रशासनास इशारा.

242
0

बेस्ट उपक्रमातील वीज ग्राहक वर्गास अदानीचे नवीन विद्युत स्मार्ट मीटर निवासी ग्राहक वर्गास न लावण्याच्या आपल्या निर्णयाला डावलून मुंबईमधील बेस्टच्या वीज निवासी ग्राहक वर्गास सदर नवीन विद्युत स्मार्ट मीटर लावले जात आहे त्याबाबत एक खरमरीत निवेदन  मा आ दगडू  यांनी बेस्ट महाव्यवस्थापकांना दिला आहे.
उपरोक्त विषयास अनुसरून मा आ दगडू सकपाळ यांनी बेस्ट महाव्यवस्थापक अनिल डिग्गीकर यांना  .दि५ ऑगस्ट, २०२४ रोजी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे शिष्टमंडळ घेऊन बेस्टच्या सर्व संबंधित अधिकारी वर्गासोबत बेस्ट
परिवहन भवन येथील सभागृहात बैठक घेतली होती. सदर बैठकीस बेस्ट च्या सर्व अधिकारी वर्गाने बेस्टच्या निवासी
वीज ग्राहक वर्गास अदानी कंपनीचे नवीन विद्युत स्मार्ट मीटर लावण्यात येणार नाही असे निर्देश दिल्याचे  माहिती व लेखी स्वरूपात आम्हाला कळविली होते.
परंतु विधानसभा निवडणूक झाल्यावर आणि आता भाजपचे सरकार आल्यावर सोमवार दि. २५ नोव्हेंबर,
२०२४ पासून बेस्टच्या अधिकारी वर्गाने अदानी कंपनीच्या कंत्राटदाराला नवीन विद्युत स्मार्ट मीटर निवासी वर्गास
लावण्याचे परवानगी दिली आहे आणि ते सरसकट सर्व मुंबई चुनाभट्टी पासून कुलाबा, बॅकबे पर्यंत असलेल्या बेस्टच्या
११ लाख वीज ग्राहक वर्गास त्यात निवासी वर्ग देखील आहेत. त्यांना न विचारता तसेच सदर मुद्दा अधिवेशन
स्थगित असताना त्याला परवानगी न मिळता बेस्ट महाव्यवस्थापकांनी  बेस्टकडून सदर नवीन विद्युत स्मार्ट मीटर लावायची परवानगी कोणत्या आधारावर दिली असा प्रश्न  दिलेल्या निवेदनात विचारला आहे.
बेस्ट अदानीला देऊन संपविण्याचा व्यवस्थापनाचा जर डाव असेल तर ते आम्ही होऊ देणार नाही. त्यामुळे सदर
बेस्टच्या निवासी ग्राहक वर्गास नवीन विद्युत स्मार्ट मीटर लावण्यास तात्काळ स्थगिती देण्यात यावी अथवा पुढील १०
दिवसात आपणाकडून सकारात्मक उत्तर न आल्यास शिवसेना स्टाईलने प्रतिक्रीया उमटल्यास त्याला आपणच
जबाबदार असाल.असा इशाराही यात देण्यात आला आहे.तसेच सदर विषयाबाबत व्यवस्थापकांंच्या दालनात तात्काळ बैठकीसाठी तारीख व वेळ द्यावी, ही विनंतीही माजी वि स स दगडू (दादा) सकपाळ यांनी केली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here