Home Uncategorized *राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने भारतीय संविधान दिन साजरा! मुंबईत  प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरेंंनी केले...

*राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने भारतीय संविधान दिन साजरा! मुंबईत  प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरेंंनी केले संविधान वाचन…*

158
0

*राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने राज्यभर भारतीय संविधान दिन साजरा*

*मुंबईत प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी केले संविधान वाचन…*

मुंबई दि. २६ नोव्हेंबर – राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने भारतीय संविधान दिन प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांच्या उपस्थितीत मुंबई व राज्यभर साजरा करण्यात आला.

सकाळी १०.१० वाजता प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. त्यानंतर संविधानाच्या उद्देशिकेचे सामुहिक वाचन करण्यात आले.

यावेळी आ शिवाजीराव गर्जे, आ सना मलिक – शेख, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे, मुंबई कार्याध्यक्ष सिध्दार्थ कांबळे, दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष महेंद्र पानसरे, प्रदेश प्रवक्ते मुकेश गांधी, प्रदेश सरचिटणीस बाप्पा सावंत, ज्येष्ठ नेते बापू भुजबळ, कुलाबा तालुकाध्यक्ष किरण शिंदे, उत्तर – मध्य जिल्हाध्यक्ष अर्शद अमीर, मुंबई बँकेचे संचालक नंदू काटकर, सिध्दीविनायक मंदिर ट्रस्टचे सदस्य सुदर्शन सांगळे व इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here