राज्याच्या सत्तेची चावी कुणाच्या हाती पडणार? याचं चित्र अवघ्या काही तासांतच स्पष्ट होणार आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीच्या हायव्होल्टेज लढतींपैकी एक लढत म्हणजे, माहीम विधानसभा मतदारसंघाची लढाई.
माहीममध्ये तिरंगी लढत होती. यामध्ये शिंदेंची शिवसेना , ठाकरे शिवसेना आणि मनसे अशा तीन पक्षांचे उमेदवार रिंगणात उतरले. महीममध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरले .
निवडणुकीच्या घोषणेआधीपासूनच माहीम विधानसभेची चुरस चर्चेत होती. कधी दुहेरी, कधी तिहेरी असं म्हणत माहीममध्ये ठाकरेंचे महेश सावंत , मनसेचे अमित ठाकरे आणि शिवसेना शिंदे गटाचे सदा सरवणकर यांच्यात तिरंगी लढत पाहायला मिळाली.
आता निकालाला काही तास शिल्लक असताना माहीममधले भाजपचे सर्वच्या सर्व पदाधिकारी माझ्यासोबतच आहे, असं म्हणणाऱ्या सदा सरवणकरांना माहीम विधानसभेत सुमडीत धोका तर मिळाला नाही ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे. याला कारण आहे, माहीममधल्या भाजपच्या पदाधिकाऱ्यानी हातात शिवबंधन बांधण्याचा निर्णय घेतला.
माहीम विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उपाध्यक्ष सचिन शिंदे यांनी निवडणूक निकालाच्या एक दिवस अगोदर, , आज शुक्रवारी दुपारी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश केला आहे.
सचिन शिंदे यांंनी मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांना घेऊन मातोश्रीवर हा पक्षप्रवेश केला. यावेळेस माहीमचे उमेदवार महेश सावंतही उपस्थित होते.



















