हिंदुहृदयसम्राट मा.बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिन निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुतळ्यास केला पुष्पहार अर्पण*


कुलाबा येथे हिंदुहृदयसम्राट मा.बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने पुतळ्यास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यावेळेला शिवसेनेच्या नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, मीना कांबळी, विभागप्रमुख दिलीप नाईक आदी उपस्थित होत्या. यावेळी अनेक शिवसैनिकांनी गर्दी केली होती.

















