Home मुंबई गणपती मिरवणुकीत गोळ्या झाडलेल्यांना सोडणार नाही- आदित्य ठाकरेंचा इशारा* *महाराष्ट्रातुन अनेक...

गणपती मिरवणुकीत गोळ्या झाडलेल्यांना सोडणार नाही- आदित्य ठाकरेंचा इशारा* *महाराष्ट्रातुन अनेक प्रकल्प गेले त्याला मनसेचा पाठिंबा आहे का ?- आदित्य ठाकरेंचा सवाल*

114
0

*गणपती मिरवणुकीत गोळ्या झाडलेल्यांना सोडणार नाही- आदित्य ठाकरेंचा इशारा*

*महाराष्ट्रातुन अनेक प्रकल्प गेले त्याला मनसेचा पाठिंबा आहे का ?- आदित्य ठाकरेंचा सवाल*

*महायुतीचे उमेदवार हारून खान, महेश सावंत, संजय भालेराव यांच्यासाठी आदित्य ठाकरे मैदान*

   शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांच्या प्रचाराचा झांजवात सद्या महाराष्ट्रात सुरू आहे . आज मुंबईतील वर्सोवा मतदासंघाचे उमेदवार हारून खान, घाटकोपर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार संजय भालेराव, आणि दादर महिमचे उमेदवार महेश सावंत यांच्या प्रचारार्थ आदित्य ठाकरे यांच्या सभा पार पडल्या  . यावेळी माझ्या सोबत सरकार स्थापन करण्यासाठी आणि मुंबईच्या विकासाची गंगा वाहती ठेवण्यासाठी या शिलेदरांची गरज लागणार असून, त्यांना विधानसभेत सोबत पाठवण्याची विनंती आदित्य ठाकरे यांनी मतदारांना केली .
यावेळी जातपात-धर्म विसरून ‘महाराष्ट्रप्रेमी’ म्हणून मला इथे प्रत्येकाची एकजूट दिसली. ह्या एकजुटीला मजबूत करून, मशालीच्या विजयाला बळकटी देऊया, असं आवाहन आदित्य ठाकरे यांनी मतदारांना केलं .

*महाराष्ट्रातुन अनेक प्रकल्प गेले त्याला मनसेचा पाठिंबा आहे का ?- आदित्य ठाकरेंचा सवाल*

सद्याच्या सरकारने सर्व उद्योग धंदे गुजरातला नेले, ५ लाख लोकांच्या नोकऱ्या काढून घेतल्या . मनसेने लोकसभेत ज्यांना बिनशर्त पाठींबा दिला त्यांनी प्रकल्प गुजरातला नेले . ज्यांनी शिवसेना फोडली त्यांना यांनी बिनशर्त पाठिंबा दिला . महाराष्ट्रातुन अनेक प्रकल्प गेले त्याला मनसेचा पाठिंबा आहे का ? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला . जेव्हा माझा महाराष्ट्र कोव्हीडशी दोन हात करत होता तेव्हा तुम्ही कुठे गल्ली बोळात दिसला का ? निवडणूक आली कि दोन महिने जागे होणारे हे लोक आहेत, असं म्हणत मनसेवर टीका केली .

 

*गणपती मिरवणुकीत गोळ्या झाडलेल्यांना सोडणार नाही- आदित्य ठाकरेंचा इशारा*

 

यावेळी भाषण करताना आदित्य ठाकरे म्हणाले की काही जणांनी भाजपला लोकसभेत पाठिंबा दिला पण त्यांना त्यांची जागा भाजपने विधानसभा निवडणुकीत विरोध करून दाखवली . आपणही त्या गद्दरांना सोडणार नाही, ज्यांनी गोळी झाडल्या त्यांना तर आपण सोडणार नाही एवढं नक्की आहे . 23 तारखेला आपलं सरकार येणार आणि दुसर्या दिवशी त्याला UAPA कायद्या अंतर्गत अटक करणार . असा इशारा गणपतीत गोळीबार करणाऱ्या आमदाराला आदित्य ठाकरे यांनी दिला .

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here