मोदी साहेबांच्या डिजीटल इंडियामध्ये ऐन विधानसभा निवडणूकांच्या काळात महाराष्ट्र विधानभवनची नेट पेमेंट यंत्रणा १५ दिवसांपासून ठप्प?!
लाडक्या बहिणींना नेट थेट दिवाळी भेट अग्रीम देणा-या महाराष्ट्र विधानभवनमध्ये इंटरेस्ट च्या माध्यमातून कारभार सुरु करण्याच्या वल्गना केल्या जात असतात. प्रत्यक्षात मात्र राज्य विधिमंडळातील इंटरनेट व्यवस्था १५-१५ दिवस ठप्प असल्याची तक्रार येथील कर्मचारीच करताना दिसत आहेत. त्यामुळे राज्यातील लोकप्रतिनिधीच्या निवृत्ती वेतनासह अन्य सर्वच प्रकारचा कारभार गेल्या १५ दिवसांपासून ठप्प झाला आहे. या तांत्रिक दुरुस्ती कडे वरिष्ठ अधिका-यांचे लक्ष नसल्याने विधान भवनच्या सुरक्षा यंत्रणा देखील अडचणीत सापडल्याची सूत्रांची माहिती आहे. महत्वाचे म्हणजे ऑनलाइन पत्रव्यवहार ,देयके,कर्मचा-यांचे पगार लोकप्रतिनिधी चे निवृत्ती वेतनासह अन्य लाभाची रक्कम देण्याची सुविधा ठप्प झाल्याचे सांगण्यात येत आहे
Home महाराष्ट्र मोदी साहेबांच्या डिजीटल इंडियामध्ये ऐन विधानसभा निवडणूकांच्या काळात महाराष्ट्र विधानभवनची नेट पेमेंट...



















