Home Uncategorized बारा बलुतेदार महासंघाचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला पाठींबा

बारा बलुतेदार महासंघाचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला पाठींबा

118
0

मुंबई

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बारा बलुतेदारांचे प्रश्न सोडविण्याचा शब्द ओबीसी बारा बलुतेदार महासंघाला दिला, त्यामुळे आज
बारा बलुतेदार महासंघाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला शिवालय येथे शिवसेना नेते, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या उपस्थितीत आपला जाहीर पाठींबा दिला आहे.
बारा बलुतेदार हे ग्रामीण भागात महत्वाचे घटक आहेत. शिवसेना ही
सर्वसामान्य माणसाला जोडणारा दुवा आहे. बारा बुलतेदार महासंघाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व महाविकास आघाडीला पाठींबा दिला म्हणजे ही एक परिवर्तनाची नांदी आहे. आधीच्या सत्ताधाऱ्यांच्या काळात या महासंघाच्या
अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत याची जाणीव पक्षप्रमुख यांना आहे. त्यामुळे या घटकाला न्याय देऊन समाधान देण्याचा प्रयत्न शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा असेल, अशी ग्वाही अंबादास दानवे यांनी दिली.

यावेळी बारा बुलतेदार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष कल्याणराव दळे, सचिव चंद्रकांत गवळी, उपाध्यक्ष प्रतापराव गुरव,शिवाजीराव ठपके, लक्ष्मणराव वडले, सतिष कसबे, भानुदास पानसरे, कृष्णकुमार पानसरे, पांडुरंग भवर आदी यावेळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here