वरळी विधानसभेचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार आदित्यजी ठाकरे यांचा उमेदवारी नामांकन दाखल झालाय.उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मोठया प्रमाणात शिवसैनिकांसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी रॅलीत सहभागी झाले होते.लोअरपरेल येथील शिवसेना शाखा क्रमांक 198 येथून भव्य मिरवणुकीत स्थानिक मतदार राजा ही सहभागी होता.यावेळी आदित्य ठाकरेंना शुभेच्छा देताना आमची निशाणी मशाल हेचं सांगत होते
आदित्य ठाकरे उमेदवारी अर्ज दाखल करताना शिवसैनिकांकडून मोठी जय्यत तयारी केली होती.यावेळी महाविकास आघाडी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मोठं शक्तीप्रदर्शन वाजता,गाजत जयघोशात करण्यात आलं.
यावेळी शिवसेना नेते सुभाष देसाई,खासदार अरविंद सावंत, प्रियंका चतुर्वेदीजी, आमदार सुनील शिंदे, आमदार सचिन अहिर,माजी महापौर किशोरीताई पेडणेकर, माजी उपमहापौर शुभांगी वरळीकर आदी यावेळी उपस्थित होते.













