Home मुंबई कॉन्ट्रॅक्टर नेमला नाही, परवानगी मिळाल्या नाहीत, तरीही भूमिपूजन करणार का ?

कॉन्ट्रॅक्टर नेमला नाही, परवानगी मिळाल्या नाहीत, तरीही भूमिपूजन करणार का ?

113
0

पंतप्रधानांच्या हस्ते होणाऱ्या अपूर्ण प्रकल्पाच्या भूमिपूजन-उद्घटनांवरून आदित्य ठाकरेंचा सवाल

आमचं सरकार आल्यावर सगळ्या चौकशीला समोर जावं लागेल- आदित्य ठाकरेंचा इशारा

मुंबई, 

शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, मां आमदार श्री आदित्यजी ठाकरे यांची आज मातोश्री येथे पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेतून मुंबई ठाण्यात पंतप्रधानांच्या हस्ते पार पडणाऱ्या रस्ते, बोगद्याच्या भूमिपूजन सोहळ्यावरून आदित्य ठाकरेंनी सरकारला सवाल केले आहेत . प्रकल्पांना अद्याप पूर्ण परवानग्या नसताना, कोणतीही प्रक्रिया पूर्ण झाली नसताना शासनाकडून भूमिपूजनाचा घाट घातला जातोय . पंतप्रधान मोदी यांच स्वागत, पण एकदा भूमिपूजन करण्याआधी प्रकल्पची माहिती घ्यावी असं आवाहन आदित्य ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांना केलं .
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येणाऱ्या ५ तारखेला ठाण्यात गायमुख भाईंदर रस्ता, बोगदा आणि कामाचं भूमिपूजन पार पडणार आहे, दरम्यान या प्रकल्पांसाठी निविदा काढणे, परवानग्या मिळणे आणि इतर अनेक बाबी अपूर्ण असताना भूमिपूजनाचा कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. यावरून आदित्य ठाकरे यांनी सरकारला जाब विचारत इशारा दिला आहे .

*कॉन्ट्रॅक्टर नेमला नाही, परवानगी मिळाल्या नाहीत, तरीही भूमिपूजन करणार का ?*

प्रधानमंत्र्यांच्या हस्ते गायमुख भाईदर रस्ता प्रकल्पाचं भूमिपूजन होणार आहे, त्यासाठी १४ हजार कोटीच आणि शॉर्ट टेंडर नोटीसमध्ये २० दिवसात टेंडर काढल असून त्याचं भूमिपूजन होईल . मुख्यमंत्री मोदींना ठाण्यात घेऊन जाताय, पण प्रधानमंत्री कार्यालयाने माहिती घ्यावी, कॉन्ट्रॅक्टर नेमला नाही . सगळ्या परवानगी मिळाल्या नाहीत . मग तरी सुद्धा तुम्ही भूमिपूजन करणार का ? प्रधानमंत्री पदाची गरिमा राखण गरजेचं असतं . असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी सवाल केले .

*आमचं सरकार आल्यावर सगळ्या चौकशीला समोर जावं लागेल- आदित्य ठाकरेंचा इशारा*

आदित्य ठाकरे यांनी सरकारकडून अपुऱ्या प्रकल्पावरून सरकारला धारेवर धरत इशारा दिला आहे . यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले ‘मुबंईतील मिमेंट कॉनकरीट रस्त्याची काम अद्याप अपूर्ण आहेत.शिवस्मारकचा भूमिपूजन २०१७ केल, त्याच काय झालं ? राम मंदिराच सुद्धा अर्धवट उदघाटन केलं . नव्या संसदेचा सुद्धा उदघाटन केलं ते अर्धवट . आमच सरकार आल्यावर तुम्हला सगळ्या चौकशीला समोर जावं लागेल . आणि आम्ही महाराष्ट्रला लुटू देणार नाही, असा इशारा दिला. तसेच प्रधानमंत्री कार्यालयाने यां सगळ्याचा अभ्यास करायला हवा . ठाणे बोरिवली टनेलच काम सुद्धा बघा, त्याचा सुद्धा अभ्यास करा, नुसते भूमिपूजन करताय . तुम्हाला जर नुसतच उदघाटन करायच असेल तर करा, त्याने खोटं काम समोर येईल असं आदित्य ठाकरेंनी आवाहन केलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here