गल्ली बोळात बेस्ट पोहोचावी आणि अधिकाधिक मुंबईच्या प्रवासी वर्गास सुखकर सेवा मिळावी म्हणून बेस्ट उपक्रमाने साधारण चार वर्षापूर्वी मिनी बसगाड्या प्रवासी वर्गाच्या सेवेत आणल्या होत्या मात्र सदर बस वारंवार बंद पडणे तसेच कंत्राटदारांनी बेस्टची थकित बिल न दिल्याने बेस्टने सदर गाड्या बेस्ट उपक्रमाच्या आणिक आगारात तश्याच ठेवून दिल्या आहेत.
सदर बस गाड्या चार वर्षांपासून अश्याच उभ्या असल्याने त्याकडे कुणाचेच लक्ष नाही.मुंबईकर जनतेस बस कमी असल्याने वेळेवर सेवा मिळत नाही दुसरी कडे बेस्टच्या सायन येथील आणिक आगारात ह्या बस अश्याच पडून आहेत.
सदर बेस्टच्या आणिक आगारात बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत,सायन विधानसभा प्रमुख गोपाळ शेलार,महिला विभाग संघटक पद्मावती ताई शिंदे,विधानसभा संघटक गजानन पाटील,उप विभागप्रमुख प्रभाकर भोगले, माजी नगरसेवक रामदास कांबळे,शाखाप्रमुख संजय म्हात्रे, नंदा शाहू,उद्या सकाळी 10 वाजता आणिक आगार पाहणी करणार आहेत.





















