Home Uncategorized *रेल्वे पोलीस व कर्मचाऱ्यांचे अभिनंदनीय काम*

*रेल्वे पोलीस व कर्मचाऱ्यांचे अभिनंदनीय काम*

222
0

*रेल्वे पोलीस व कर्मचाऱ्यांचे अभिनंदनीय काम*

दिनांक १६/०९/२४ रोजी गणेश शिंदे हे सपत्नीक आपल्या मुलासोबत बाहेरून येत असताना छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे जाणाऱ्या ट्रेन मध्ये बसले होते,ते सायन येथील गुरू तेग बहादुर नगर येथे उतरले आणि उतरल्यावर त्यांच्या लक्षात आले आपल्या हातातील बॅग ट्रेन मध्येच राहिली,त्यावेळी लगेच सदर ट्रेनच्या मागून येणारी दुसरी ट्रेन पकडली आणि वडाळा रेल्वे पोलीस चौकीत संपर्क साधला त्यावेळी ड्युटीवर असणारे सचिन मांडले यांना त्यांनी माहिती दिली,त्यावेळी रेल्वे पोलीस अधिकारी सचिन मांडले यांनी ड्युटीवर असलेल्या चार पोलिस कर्मचारी वर्गाशी संपर्क साधला आणि पुढील दहा मिनिटात त्यांना फोन आला सदर बॅग ट्रेन मध्ये सापडली आहे.आणि गणेश शिंदे यांची ट्रेन मध्ये राहिलेली बॅग फक्त अर्ध्या तासात रेल्वे पोलीस कर्मचारी, अधिकारी वर्गाने शोधून काढली.गणेश शिंदे यांनी सदर बॅग शोधून व्यवस्थित ठेवणारे पोलीस कर्मचारी, अधिकारी सचिन मांडले योगेश शिर्के,तसेच सर्व रेल्वे पोलीस कर्मचारी अधिकारी वर्गाचे आभार मानले. अत्यंत हुशार आणि तल्लख बुध्दीने काम करणाऱ्या महाराष्ट्र रेल्वे पोलिस कर्मचारी वर्गाचे मनापासून आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here