Home Uncategorized महाराष्ट्र म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वाभिमान, स्वराज्याचे मूळ.

महाराष्ट्र म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वाभिमान, स्वराज्याचे मूळ.

163
0

 

शिवाजी महाराजांनी उभारलेले किल्ले अजून शाबूत आहेत पण २०२३ रोजी सिंधुदुर्गातील मालवण राजकोट किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते अनावरण झालेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नेस्तनाबूत झाला आहे.

पंतप्रधान मोदी देखील त्या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि आता हा पुतळा कोसळला. आठ महिन्यात छत्रपतींच्या पुतळ्याची ही अवस्था. या घटनेची चौकशी झालीच पाहिजे. किमान तुमच्या टक्केवारीत छत्रपती शिवाजी महाराजांना तरी सोडायला हवे होते.

छत्रपतींच्या मूल्यांना आधारित हे सरकार नाहीच, हे सिद्ध झाले आहे.राज्यातील महायुती सरकार हे महाविनाशी सरकार आहे हे आम्ही का म्हणतोय हे आज महाराष्ट्रातील जनतेला दिसतय.

  1. या ठिकाणी पुन्हा एकदा दिमाखात छत्रपतीं शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात यावा, पण ज्यांनी कोणी छत्रपती शिवाजी महाराजांची अहवेलना केली असेल त्या कंत्राटदाराला काळया यादीत टाकण्यात यावे. संबंधित कंत्राटदाराचे सुरू असलेले सर्व काम तातडीने काढून घेण्यात यावे ही आमची मागणी आहे.
    महाराजांचा अपमान करणाऱ्यांना शिक्षा ही झालीच पाहिजे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here