Home मुंबई *कोट्यवधी मराठी माणसाला घर देणे हेच हावरेंच्या यशामागील गमक – आ. प्रवीण...

*कोट्यवधी मराठी माणसाला घर देणे हेच हावरेंच्या यशामागील गमक – आ. प्रवीण दरेकर*

7
0

* *कोट्यवधी मराठी माणसाला घर देणे हेच हावरेंच्या यशामागील गमक – आ. प्रवीण दरेकर*

*मुंबई दि. ०२-११-२०२६ :* कोट्यवधी मराठी माणसाला घर द्यायचेय ही भावना डॉ. सुरेश हावरे यांच्या मनात आहे व तेच त्यांच्या यशाचे गमक असल्याचे कौतुकोदगार भाजपा गटनेते व महाराष्ट्र स्वयंपुनर्विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष *आ. प्रवीण दरेकर* यांनी काढले.

चेंबूरच्या टिळकनगर येथील *इंटेलिजेंटीया अँपेक्स* या हावरे प्रॉपर्टीजतर्फे उभारण्यात येणाऱ्या प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा रविवारी आ. प्रवीण दरेकर यांच्या शुभहस्ते पार पडला. यावेळी माजी आमदार सूर्यकांत दळवी, नगरसेवक सुषम सावंत, हावरे प्रॉपर्टीजचे सर्वेसर्वा डॉ. सुरेश हावरे, अमित हावरे, अमर हावरे, संजय हावरे यांसह सोसायटीचे पदाधिकारी आणि सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना आ. दरेकर म्हणाले, “डॉ. सुरेश हावरे यांचे बांधकाम क्षेत्रातील काम मला दूरवरून पाहता आले. सर्वसामान्य मराठी माणसाला आपले हक्काचे घर मिळावे ही आपलेपणाची भावना घेऊन परवडणारी घरे मोठ्या प्रमाणावर त्यांनी उभी केली आहेत, याचा सार्थ अभिमान आहे. कुठलेही पाठबळ नसताना त्यांनी प्रामाणिकपणे हे साम्राज्य उभे केले आहे.”

*विकासकांचा उद्देश फक्त नफा नाही -*

“प्रत्येक विकासकाचा मूळ उद्देश घर देणे हा नसतो, तर सेलेबल टॉवर उभारून पैसा कमवणे हा असतो. परंतु हावरे यांच्यासारखे व्यावसायिक जे प्रामाणिकपणे काम करतात, त्यांचा उद्देश नफा कमवणे नाही तर मध्यमवर्गीय विशेषतः मराठी माणसाला चांगले घर मिळाले पाहिजे ही भावना घेऊन काम करतात. सभासदांशी थेट संवाद साधून अडचणी समजून घेण्याचे काम त्यांच्या कंपनीतून होते,” असेही दरेकर म्हणाले.

*स्वयं पुनर्विकासावर भाष्य -*

मुंबईत हजारो मोडकळीस आलेल्या इमारती असून, मुख्यमंत्र्यांना विनंती करून स्वयं पुनर्विकास योजना आणल्याचे दरेकरांनी सांगितले. “गृहनिर्माण संस्थांनी स्वतःची इमारत बांधण्यासाठी पुढाकार घ्यावा, त्यासाठी मुंबई बँक कर्ज देईल, सरकार सवलती देईल अशी योजना आणली. मुंबईतील मराठी माणूस मुंबईबाहेर जाण्यापासून वाचविण्याचा खारीचा वाटा आम्ही उचलला. हावरेंनी ४५ हजार ग्राहकांना घरे दिली, एवढे काम कुठलाच विकासक मध्यमवर्गीयांसाठी करत नाही. कमी नफा झाला तरी चालेल पण मध्यमवर्गीयांना घर द्यायचेय या भावनेने काम करणाऱ्या हावरेंचा अभिमान वाटतो,” असे कौतुकोदगार त्यांनी काढले.

—
*सद् रक्षणाय, खल दमनाय.*
*संपादक: प्रो. शीतल हरीश करदेकर – MAI MEDIA 24*

—

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here