Home पुणे भगवती रुग्णालयाचे खाजगीकरण PPP तत्वावर??

भगवती रुग्णालयाचे खाजगीकरण PPP तत्वावर??

38
0

भगवती रुग्णालयाचे खाजगीकरण PPP तत्वावर??

दि.४ फेब्रुवारी २०२५ रोजी महापालिका आयुक्तांकडून अर्थसंकल्पावरील चर्चेत भगवती रुग्णालय PPP तत्वावर देण्याचे जाहीर केले होते. राजकीय पक्षांचे पदाधिकारी व नागरिकांच्या लक्षात ही बाब मी त्याच दिवशी आणून दिली.

दि. १० मार्च २०२५ रोजी महापालिकेने निविदा सूचना प्रसिद्ध केली.

दि. २४ मार्च २०२५ रोजी मुंबई महापालिकेत प्रिबीड बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत शिवसेना उपनेते माजी आमदार विनोद घोसाळकर, माजी आमदार विलास पोतनीस, काँग्रेस पदाधिकारी ॲड. संदेश कोंडविलकर व ॲड . अशोक सुत्राळे, विभागप्रमुख उदेश पाटेकर, व इतर नगरसेवक यांनी आक्रमक भूमिका घेऊन बैठक रद्द करण्यास भाग पाडले. भगवती रुग्णालयाचे खाजगीकरण रद्द करण्या बाबत निवेदन महापालिका आयुक्त यांना देण्यात आले.

महाराष्ट्र विधीमंडळात दि. २६ मार्च २०२५ रोजी विधान परिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, मुंबई काँग्रेस माजी अध्यक्ष आमदार भाई जगताप, सुनील प्रभू यांनी याविषयी औचित्याचा मुद्दा उपस्थित करून चर्चा घडवून आणली.

याबाबत हजारो ईमेलच्या माध्यमातून जन आक्रोश व्यक्त करण्यात आला. पत्रकाद्वारे जनजागृती करण्यात आली.

दि.८ एप्रिल २०२५ रोजी मुंबई महापालिका आयुक्त यांच्या सोबत माननीय श्री. अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना व काँग्रेस पक्षाचे आमदार व पदाधिकारी यांची बैठक झाली..या बैठकीत भाई जगताप, सुनील प्रभू, विनोद घोसाळकर, विलास पोतनीस , संदेश कोंडविलकर यांनी भगवती रुग्णालयाचे खाजगीकरण रद्द करून महापालिकेनेच आरोग्य सेवा द्याव्यात अशी आग्रही मागणी केली तसेच महापालिका हे रुग्णालय चालविण्यासाठी मनुष्यबळ व साधनसाम्रगी कशी उपलब्ध करू शकेल याबाबत सूचना केल्या.

मा. आयुक्त यांनी एकही निविदा आली नाही, खाजगीकरणाचा कोणताही निर्णय अंतिम घेतलेला नाही, मुंबई महापालिका याचे प्रचलन व संचालन करील असे सांगितले .
त्यामुळेच दि. ११ एप्रिल चे जन आंदोलन स्थगित करण्यात आले.

पक्षीय राजकारण न आणता लोकभावनेचा प्रश्न म्हणून अनेक नागरी संघटना इ. याविषयी एकत्र केले.

उत्तर मुंबईत ३ हजार खाटांची खाजगी रूग्णालये येत आहेत मग गरीब मध्यमवर्गीय , कष्टकरी , श्रमिकांना विनामूल्य वा मोफत आरोग्य सेवा कोण देऊ शकते फक्त मुंबई महापालिका.

धर्मादाय रूग्णालयांचा वाईट अनुभव संपूर्ण महाराष्ट्र घेत आहे .

धनदांडग्यांच्या धर्मादाय संस्था लूटमारच करणार.. शब्द फिरवून ( Public Private Partnership) योजना कार्यान्वित करून गोरगरीब जनतेला विनामूल्य वा अल्पदरात आरोग्य सेवेपासून वंचित ठेवण्याचा डाव लोकप्रतिनिधी, राजकीय, सामाजिक कार्यकर्त्यांनी ओळखला पाहिजे.

हजारो कोटींच्या ठेवी असलेल्या मुंबई महापालिकेनेचे भगवती रुग्णालयाचे प्रचलन व संचालन करावे अशी जनतेची मागणी आहे.

रूग्णालये PPP तत्वावर चालविण्यासाठी सल्लागार नियुक्त करण्याचा प्रस्ताव महापालिकेत आला आहे.

आज सकाळी शिवसेना उपनेते माजी आमदार विनोद घोसाळकर यांनी किशोरी पेडणेकर यांना आणि मी काँग्रेस गटनेते अश्रफ आझमी यांच्याशी चर्चा केली आहे.

ॲड. संदेश कोंडविलकर
सरचिटणीस
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here