शेतकऱ्यांच्या हक्कासाठी संघर्ष अटळ आहे! – विजय वडेट्टीवार
दुष्काळ जाहीर करण्यातही सत्ताधाऱ्यांनी घाणेरडं राजकारण केलं आहे. चंद्रपूर-गडचिरोलीच्या शेतकऱ्यांवर चाललेला अन्याय आणि भेदभाव आम्ही खपवून घेणार नाही.
पावसाचा प्रदीर्घ खंड, करपा आणि खोडकिडीच्या प्रादुर्भावामुळे शेती उद्ध्वस्त झाली असताना गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी, देसाईगंज (वडसा), कुरखेडा, कोरची आणि धानोरा या पाच तालुक्यांचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्यात आलेला नाही. या अन्यायाविरोधात आम्ही सरकारला पत्र लिहून या तालुक्यांचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्याची मागणी केली होती. मात्र, आमच्या मागणीकडे दुर्लक्ष करून या पाच तालुक्यांना यादीबाहेर ठेवण्यात आले.
शेतकऱ्यांच्या गंभीर परिस्थितीची जाणीव सरकारला नाही का? शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील अश्रू सरकारला दिसत नाहीत का? आम्ही बाधित शेतकऱ्यांच्या हक्काचा एक रुपयाही बुडू देणार नाही! गडचिरोलीतील वगळलेल्या पाचही तालुक्यांसह चंद्रपूर जिल्ह्यातील पात्र बाधित तालुक्यांचा तातडीने दुष्काळग्रस्त यादीत समावेश करावा आणि शेतकऱ्यांना प्रति हेक्टर ₹२०,००० मदत जाहीर करावी.
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
@SunetraA_Pawar
@mieknathshinde
@bharanemamaNCP
#farmercrisis #maharashtradrought






















