Home मुंबई *अंतुर्लीत बोगस शिक्षक भरती घोटाळा: सचिव विनोद तराळचा अटकपूर्व जामीन फेटाळला, हायकोर्टाचे...

*अंतुर्लीत बोगस शिक्षक भरती घोटाळा: सचिव विनोद तराळचा अटकपूर्व जामीन फेटाळला, हायकोर्टाचे ताशेरे*

56
0

*अंतुर्लीत बोगस शिक्षक भरती घोटाळा: सचिव विनोद तराळचा अटकपूर्व जामीन फेटाळला, हायकोर्टाचे ताशेरे*

*मुक्ताईनगर/मुंबई:* अंतुर्ली ता.मुक्ताईनगर येथील एम.एफ.तराळ विद्यालयातील बोगस भरती प्रकरणात बॉम्बे हायकोर्टाने मोठा दणका दिला आहे. मिठाराम फकीरा तराळ व मंगू रामजी महाजन संस्थेचे सचिव विनोद रामदास तराळ यांचा अटकपूर्व जामीन न्यायमूर्ती माधव जामदार यांनी फेटाळला असून बोगस भरती केल्याचे ताशेरे ओढले आहेत.हे गाव माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचे आहे.
*न्यायालय:* मुंबई उच्च न्यायालय, *न्यायमूर्ती:* माधव जे.जामदार, *दिनांक:* १३ ऑक्टोबर २०२६, *अर्जदार:* विनोद रामदास तराळ(ट्रस्ट सचिव), *गुन्हा:* गु.र.नं.१६४/२०२५ नाशिक रोड पोलीस स्टेशन, *कलमे:* BNS ३१६(५),३१८(४),३३६(३),३३८,३४०(२).
*घोटाळ्याचे स्वरूप:* नाशिक विभागात ९६ शिक्षक/शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या २०२२-२४ मध्ये करून त्या २०१२ पासून झाल्याचे दाखवून कोट्यवधींची थकबाकी लाटण्यात आली.मूळ फिर्याद तत्कालीन शिक्षण उपसंचालक भाऊसाहेब चव्हाण यांनी दिली होती,पण तपासात ते स्वतःच आरोपी निघाले.
*अंतुर्लीतील प्रकार:* एम.एफ.तराळ विद्यालयात १७ कर्मचाऱ्यांची भरती २०२४ मध्ये करून ती २०१४-१७ मध्ये झाल्याचे दाखवून २ कोटींहून अधिक रक्कम खोट्या कागदपत्रांनी उचलली.अर्जदाराने मुख्य भूमिका बजावल्याचे कोर्टाने नमूद केले.
*कोर्टातील ठोस पुरावे:* १)मुख्याध्यापक राजेश पाटील(२०१९-२२)यांचा जबाब-हे १७ कर्मचारी माझ्या काळात शाळेत नव्हतेच.२)२५ लाखात नोकरी-एका शिक्षकाने नोकरीसाठी २५ लाख दिले,त्यासाठी वडिलोपार्जित जमीन विकली.३)जळगाव शिक्षणाधिकाऱ्यांचे ९ फेब्रुवारी २०२६ चे पत्र-या नियुक्त्यांचे कोणतेही रेकॉर्ड कार्यालयात नाही.४)१८ मे २०२६ च्या पत्रातच स्पष्ट-जावक रजिस्टरमध्ये फेरफार करून नावे घुसडली,हस्ताक्षरात तफावत,मूळ नस्ती गायब-यावरूनच कागदपत्रे बनावट असल्याचे सिद्ध.
*निर्णय:* रेकॉर्ड उपलब्ध नाही आणि सादर केलेले रेकॉर्ड बनावटपणे तयार केलेले दिसते,अटकपूर्व जामीन देण्यासारखा कोणताही आधार नाही,असे सांगत हायकोर्टाने अर्ज फेटाळला.
*MAI MEDIA 24 | संपादक:प्रो.शीतल हरीश करदेकर*

—

*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here