पद्मभूषण, क्रांतिवीर डॉ. नागनाथ अण्णांचे विचार नव्या पिढीने जोपासावेत!-ना. उदय सामंत
पद्मभूषण क्रांतिवीर डॉ. नागनाथ अण्णा नायकवडी हुतात्मा किसन अहिर सहकारी साखर कारखान्याच्या (वाळवा, जि. सांगली) सन २०२६-२७ मधील ४४ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ सोमवारी मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आला.
मेहनत, कष्ट आणि सहकाराच्या बळावर उभ्या राहिलेल्या या कारखान्याची प्रगती पाहून मनापासून आनंद झाला. शेतकऱ्यांच्या हितासाठी आयुष्यभर संघर्ष करणाऱ्या क्रांतिवीर डॉ. नागनाथ अण्णांचे विचार आणि कार्य येणाऱ्या पिढ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी आहेत. त्यांचे विचार जपत सहकाराची ही परंपरा अधिक समृद्ध करण्याची गरज आहे.
या कारखान्याची वाटचाल पाहून कोकणातही सहकाराच्या माध्यमातून साखर कारखाना उभारण्याचा विचार मनात आला. तसेच, महिला भगिनीला कारखान्याच्या अध्यक्षपदाची संधी दिल्याबद्दल संचालक मंडळाचे विशेष अभिनंदन! सहकारातून समृद्धी, शेतकऱ्यांच्या कष्टांना प्रतिष्ठा आणि नव्या पिढीला प्रेरणा, हाच क्रांतिवीर डॉ. नागनाथ अण्णांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा मार्ग!
या प्रसंगी खासदार धैर्यशील माने, आमदार सुहास बाबर, कारखान्याचे संचालक गौरव नायकवडी, हुतात्मा बँकेचे चेअरमन किरणदादा नायकवडी, केदारभैय्या नायकवडी, डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील, कराडचे नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांच्यासह विविध मान्यवर, कारखान्याचे संचालक, पदाधिकारी, सभासद, शेतकरी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
@shivsenaofc @devendra_fadnavis @mieknathshinde
#udaysamant #udaysamantsaheb #क्रांतिवीरडॉनागनाथअण्णा #डॉनागनाथअण्णानायकवडी #सहकारचळवळ #साखरकारखाना #शेतकरीहित #सहकारातूनसमृद्धी #वाळवा #डॉउदयसामंत






















