Home उद्योग / शिक्षण वार्ता गाव तिथे उद्योजक! शिर्डीतून रोजगाराचा नवा संकल्प

गाव तिथे उद्योजक! शिर्डीतून रोजगाराचा नवा संकल्प

30
0

गाव तिथे उद्योजक! शिर्डीतून रोजगाराचा नवा संकल्प

शिर्डीत खासदार भाऊसाहेब वाकचौरे आणि युवा नेते रोहित वाकचौरे यांनी आयोजित केलेल्या ‘आनंद नोकरी मेळावा २०२६’ ला उपस्थित राहिलो.
या मेळाव्यामध्ये १५७ कंपन्यांचा सहभाग होता. त्यातून ७०० पेक्षा अधिक बेरोजगारांना प्रशिक्षण तर सुमारे २५०० जणांना नोकरीसाठीचे पत्र देण्यात आले…अहिल्यानगरमध्ये सुमारे २० हजार कोटींचे प्रकल्प प्रस्तावित असून त्यातून सुमारे १० हजार रोजगार उपलब्ध होणार असल्याची माहिती यावेळी दिली.
‘गाव तिथे उद्योजक’ या संकल्पनेबाबतही यावेळी माहिती दिली. ‘मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजने’तून ५० लाख ते १ कोटीपर्यंत कर्ज. प्रशिक्षण आणि कर्जाची जबाबदारी उद्योग विभागाची. जिल्ह्यातील उद्योगांमध्ये स्थानिक मुलांना जास्तीत जास्त संधी देण्याचा शब्द यावेळी दिला.

नोकरी करता करता उद्योजक व्हा आणि उद्योगातून पुन्हा नोकऱ्या निर्माण करा. माझा उद्योग विभाग तुमच्या सोबत आहे, अशी ग्वाही यावेळी दिली.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राला उद्योगात आणि रोजगारात अग्रेसर करण्याचा आमचा निर्धार!

Devendra Fadnavis
Eknath Shinde – एकनाथ शिंदे
Sunetra Pawar
Shivsena – शिवसेना

#udaysamant #shirdi #maharashtra #shivsena #mahayuti

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here