Home मुंबई * व्होटचोरीविरोधात मुंबई दणाणली – काँग्रेसचा ‘लोकशाहीचा काळा दिवस’ – मुख्य निवडणूक...

* व्होटचोरीविरोधात मुंबई दणाणली – काँग्रेसचा ‘लोकशाहीचा काळा दिवस’ – मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी

38
0

* व्होटचोरीविरोधात मुंबई दणाणली – काँग्रेसचा ‘लोकशाहीचा काळा दिवस’ – मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी

* राहुल गांधींच्या पुराव्यानंतर – मुंबईच्या सहाही जिल्ह्यात काँग्रेस आक्रमक – वर्षा गायकवाड यांच्या आदेशाने आंदोलन

*मुंबई, दि. ८ ऑक्टोबर:*
केंद्रातील मोदी सरकारने – निवडणूक आयोगाच्या मदतीने – व्होट चोरी केल्याचा आरोप करत – काँग्रेस आणि इंडिया आघाडीने – देशभरात रणशिंग फुंकले आहे. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुराव्यासह व्होटचोरीची पोलखोल केल्यानंतर – आता मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना – भाजपाला मदत केल्याच्या आरोपावरून – राजीनामा द्यावा आणि अटक करावी – अशी जोरदार मागणी मुंबई काँग्रेसने केली आहे.

मुंबई काँग्रेस अध्यक्षा – *खासदार वर्षाताई गायकवाड* – यांच्या आदेशाने – मुंबईच्या सहाही जिल्ह्यात – *’लोकशाहीचा काळा दिवस’* – आंदोलन करण्यात आले.

*मालाड – उत्तर मुंबईत – मोठं शक्तीप्रदर्शन:*
उत्तर मुंबई जिल्हा काँग्रेसच्या वतीने – मालाड येथे झालेल्या आंदोलनात – माजी मंत्री *आमदार अस्लम शेख*, जिल्हाध्यक्ष *राजपती यादव*, मुंबई काँग्रेसचे प्रवक्ते *सुरेशचंद्र राजहंस*, नगरसेविका *अजंता यादव*, विरेंद्र चौधरी, कमरझाहा सिद्दिकी, हैदर अली शेख, इंदुप्रकाश तिवारी, अशोक सुत्राळे यांच्यासह – शेकडो पदाधिकारी उपस्थित होते.

*सहाही जिल्ह्यात – आंदोलन:*
दक्षिण मुंबईत – रविकांत बावकर,
दक्षिण मध्य मुंबईत – कचरू यादव,
उत्तर मध्य मुंबईत – अर्शद आझमी,
उत्तर पश्चिम मुंबईत – भावना जैन,
उत्तर पूर्व मुंबईत – केतन शाह –
यांच्या नेतृत्वाखाली – काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी – जोरदार घोषणाबाजी केली.

*पार्श्वभूमी:* राहुल गांधी यांनी वारंवार – व्होटर लिस्टमध्ये – बोगस मतदार – घुसवल्याचे पुरावे – सादर केले आहेत – आणि याला – निवडणूक आयोग – जबाबदार असल्याचा – काँग्रेसचा आरोप आहे.

—

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here