Home मुंबई *वर्सोवा येथील लोखंडवाला* *“महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिवर्सिटी” नावाखाली बॅक रोडवर अनधिकृत...

*वर्सोवा येथील लोखंडवाला* *“महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिवर्सिटी” नावाखाली बॅक रोडवर अनधिकृत भरणी*

41
0

*वर्सोवा येथील लोखंडवाला*
*“महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिवर्सिटी” नावाखाली बॅक रोडवर अनधिकृत भरणी*
*८७ कोटींचा दंड तरीही भरणी सुरूच, गुन्हा दाखल करण्याच्या जिल्हाधिकारी यांच्या सूचना*

– जिल्हाधिकारी यांच्या बैठकीत मनपा अधिकारी यांनी दिली माहिती
– मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्रातील प्रलंबित प्रश्न चर्चा करून सोडवण्यासाठी खासदार रविंद्र वायकर यांनी मुंबई उपनगर जिल्हाधिकारी यांच्या समवेत घेतली बैठक
– नेस्को मधील अनधिकृत बांधकामाबाबत तपासणी करून १५ दिवसात अहवाल देण्याचे निर्देश
– लोकसभा क्षेत्रातील एकूण ३० प्रलंबित प्रश्नांवर झाली चर्चा

*मुंबई :*
मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्रातील वर्सोवा विधासभा क्षेत्रात येणाऱ्या ‘महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिवर्सिटी” च्या नावाखाली लोखंडवाला बॅक वॉटर तलावामध्ये कंत्राटदाराकडून मोठ्याप्रमाणात अनधिकृत करण्यात येणाऱ्या भरणीबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाने अद्याप ८७ कोटींचा दंड लावला असतानाही हि अनधिकृत भरणी बंद करण्यात आली नसून दरदिवशी शेकडो ट्रकच्या माध्यमातून हि भरणी सुरूच आहे. ही बाब निदर्शनास आणून दिल्या नंतर संबंधितान विरोधात गुन्हा दाखल करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे बैठकीला उपस्थित अधिकारी यांना दिल्या. तसेच या कामावर देखरेख ठेवण्यासाठी नेमण्यात आलेल्या पथकाला याची गंभीर दाखल घेण्याच्या सूचना हि मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी दिल्या आहेत.
मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्रातील प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी खासदार रविंद्र वायकर तसेच मुंबई उपनगर जिल्हाधिकारी यांच्या समवेत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली. या बैठकीत एकूण ३० प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करून निर्णय घेण्यात आले.
*१) कल्पतरू इस्टेट, जोगेश्वरी (पूर्व) यांच्या कामातील अनियमितता :*
येथील विकासकाने मुंबई महागरपालिकेला हस्तांतरित करावयाच्या सुविधा अद्याप हस्तांतरित न करता त्यांच्या इमारतीला ताबा प्रमाणपत्र देण्यात आले आहे. जागेमध्ये मोठ्याप्रमाणात व्हेरीएशन केले आहेत. जागेवरील वृक्ष तोडून जागा वाढवण्यात आली आहे. मुंबई महानगरपालिकेने पोलीस स्थानकात गुन्हा हि दाखल केला आहे. प्रकल्पात अनेक अनियमितता करण्यात आल्याचीबाब निदर्शनास आणल्या नंतर मुंबई महानगरपालिकेच्या इमारत व प्रस्ताव विभाग, विकास नियोजन विभाग यांनी याची सखोल चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. १५ दिवसात याबाबत निर्णय घेण्यात यावा अशी सूचना खासदार वायकर यांनी यावेळी केली.
*२) मनपाची मार्केट ज्या जागांवर बसली आहेत त्या ७/१२ वर मनपाचे नाव लावून घेणे :*
मुंबई महानगरपालिकेचे नवलकर मार्केट, निर्मलाताई रागींवर मार्केट प्रेमनगर, वर्सोवा यारी रोड येथील मंडई, दत्ताजी साळवी मार्केट, अंधेरी येथील सुकी मच्छी मार्केट आदी मंडईच्या दुरावस्थेत वाढ झाली असून त्यचा पुनर्विकास निव्वळ ज्या जागेवर हि मार्केट अनेक वर्षापूर्वी वसलेली आहे त्या जागावरील ७/१२ वर अद्याप मुंबई महानगरपालिकेचे नाव नसल्याने त्याचा पुनर्विकास रखडला असल्याचीबाब खासदार यांनी जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनास आणली. हे काम पूर्ण करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयाशी याबाबत पत्रव्यवहार करून समन्वय साधावा अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या.
*३) लोकसभा क्षेत्रातील डी.पी.रोडची कनेक्टीव्हिटी करणे:*
लोकसभा क्षेत्रातील जनशक्ती पोलीस चौकी ते काशिनाथ गावकर मार्ग, समर्थनगर ते जोगेश्वरी विक्रोळी जोत रस्ता, महारज भुवन ते जोगेश्वरी गुंफा, शामनगर येथील इच्छापूर्ती श्री. गणेश मंदिर मार्ग ते गौरव हॉटेल, सर्वोदय नगर ते हनुमान मंदिर मार्ग, मेघवाडी नाका पर्यंत रस्त्याचा मार्ग, आप्पा पाडा रिक्षा…. ते सावित्रीबाई फुले नगर, रुफटोप सोसायटी मागील गुरुगोविंद सिंग रोड ते एस.व्ही.पी.रोड होली स्प्रीरिट हॉस्पिटल, एस.आर.महाडिक रोड, ओएनजीसी कॉलनी ते इच्छापूर्ती, साईबाबा मंदिर ते तानाजी नगर, रत्नागिरी हॉटेल ते लोखंडवाला (कांदिवली, पूर्व), येथील डीपी रस्त्याचे काम प्राधान्य देऊन पूर्ण करण्यात यावे. यामुळे काही अंशी वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होणार आहे. यासाठी त्या त्या विभागात सुरू असलेल्या पुनर्विकासाच्या कामातून निर्माण होणाऱ्या पीएपीची संबंधित विभागाकडून मागणी करून त्या ताब्यात घ्याव्यात., अशा सूचना देण्यात आल्या.
*४) मुंबई प्रदर्शन केंद्र (नेस्को) मुळे होणारी वाहतूक कोंडी व अनधिकृत बांधकाम:*
या प्रदर्शन केंद्रामधील प्रदर्शनामुळे रस्त्यावर मोठ्याप्रमात वाहने पार्किंग करण्यात येत असल्यामुळे या ठिकाणी वाहनचालकांना तासन तास वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. याप्रश्नी मनपाने वाहतूक विभागाशी समन्वय साधून वाहतूक कोंडी होणार नाही यासाठी प्रभावी कारवाई करावी. तसेच नेस्को मध्ये सुरु असलेल्या अनधिकृत बांधकामाची एम.ओ.एच, फायर ब्रिगेड, इमारत व प्रस्ताव विभाग यांनी संयुक्तपणे पाहणी करून १५ दिवसांमध्ये याचा अहवाल देण्याचे जिल्हाधिकारी यांचे निर्देश.
*५) रॉयल पाममधील अनधिकृत भरणी, बांधकाम व स्टुडीओ:*
रॉयल पाम येथील अनधिकृत स्टुडीओबाबतचे प्रकरण न्यायालयात असून ह्याबाबत मुंबई महानगरपालिकेने एक पॉलीसी तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ज्याठिकाणी भरणी सुरु आहे तसेच अनधिकृत बांधकाम सुरु आहे त्याची तपासणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले.
*६) गोरेगाव (पूर्व) फोर्सवनच्या हद्दीतील आदिवासी पाड्यांचे पुनर्वसन:*
या प्रश्नी चर्चा करून निर्णय घेण्यासाठी लवकरच बैठका लावण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या.
*७) नभूक्र ८२७ ए/४, ए/१, व ८२७ ए/अ, ए/स सर्वे क्र:२३९/१ :*
येथील रहेजा विकास यांनी अनधिकृत वृक्षतोड केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ह्या जागेचे अद्याप डीमार्केशन करण्यात आलेले नाही. त्यामुळे वृक्षतोड तसेच अन्य मार्गाने येथील जागा हडप करण्याचा विकासकाचा प्रयत्न असल्याने येथील जागेचे लवकरात लवकर डीमार्केशन करण्यात यावे अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या.
याच बरोबर अन्य विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्यात आले. याबैठकीला मुंबई महानगरपालिका, वाहतूक, आरे, सार्वजनिक बांधकाम, सिटी सर्वे, प्रदूषण नियंत्रण मंडळ आदी विविध विभागांचे अधिकारी, विभागप्रमुख द्यानेश्वर सावंत, अल्ताफ पेवेकर, राजू पेडणेकर, वैभव भराडकर, राजुल पटेल आदी पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here