# सरकार एकाही माथाडी कामगाराचा रोजगार हिरावू देणार नाही असे अन्न पुरवठा मंत्र्यांचे आश्वासन….
# २८ सप्टेंबर पासून सुरू असलेले बेमुदत धरणे आंदोलन तूर्त स्थगित केल्याची घोषणा…..
शासकीय धान्य गोदामातील माथाडी कामगारांचे प्रश्नावर, आज मंत्रालयात कामगार प्रतिनिधी बरोबर झालेल्या बैठकीत , एकाही गोदाम माथाडी कामगाराचा रोजगार हिरावला जाणार नाही असे ठोस आश्वासन अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिले……
सदरील बैठक, आ. नीलमताई गोऱ्हे ( माजी उपाध्यक्ष, विधान परिषद..) व माजी खासदार हुसेन दलवाई यांनी घेतलेल्या पुढाकाराने, आज मंत्रालयात झाली….
२४ एप्रिल चे पुरवठा विभागाचे चुकीच्या परिपत्रकामुळे राज्यातील सुमारे १० हजार गोदामातील माथाडी कामगारांचे रोजगार धोक्यात आल्याने, शासकीय धान्य गोदाम हमाल माथाडी कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे वतीने ,पुणे येथील कॉन्सिल हॉल येथे दि.२८ सप्टेंबर २०२६ पासून बेमुदत धरणे सत्याग्रह सुरू करण्यात आला आहे…….
राष्ट्रीय धोरणा नुसार राज्यात थेट वाहतूक सुरू होणार असली तरी, सदरील वाहतूक ही, तालुका/ जिल्हा स्तरावरील शासकीय धान्य गोदामातील नोंदीत माथाडी कामगारां मार्फत च करून घ्यावी आणि या कामासाठी माथाडी मंडळाने ठरविलेले वेतनच
दिले जावेत अशी मांडणी , कामगार प्रतिनिधींनी बैठकीत केली…..
कांही कंत्राटदार उच्च न्यायालयात गेल्याने, त्या बाबत तपासणी करून पुन्हा कामगार प्रतिनिधी बरोबर १५ दिवसात बैठक घेवून सकारात्मक निर्णय घेतला जाईल असे आश्वासन मंत्रीमहोदयांनी बैठकीत दिले…….
या आश्वासनानंतर, पुणे कौन्सिल हॉल वर सुरू असलेले बेमुदत धरणे सत्याग्रह तूर्त स्थगित केल्याची घोषणा कृतीसमितीचे वतीने, करण्यात आली……
राज्यातील १० हजार माथाडी कामगारांचे रोजगाराचा प्रश्न असल्याने या प्रश्नात मुख्यमंत्री व दोन्ही उप मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे असे आवाहन कृती समितीचे वतीने यावेळी करण्यात आले……….
गोदाम कामगारांचा हा थेट वाहतूकी चा प्रश्न १५ दिवसात मार्गी लावला नाही तर, पुन्हा रस्त्यावर उतरून आंदोलन तीव्र करावे लागेल असा इशारा कृतीसमितीचे नेत्यांनी दिला आहे….
अन्न पुरवठा मंत्री मा. छगन भुजबळ यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस, आ. डॉ. नीलम गोऱ्हे, कामगार प्रतिनिधींचे वतीने, महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे सरचिटणीस साथी सुभाष लोमटे, उपाध्यक्ष राजकुमार घायाळ व साथी विकास मगदूम, अखिल भारतीय माथाडी सुरक्षा रक्षक श्रमजीवी जनरल कामगार युनियन अरुण रांजणे, ट्रान्सपोर्ट अँड डॉक वर्कर्स युनियन चे सरचिटणीस साथी निवृत्ती धुमाळ, महामंडळाचे चिटणीस हनुमंत बहिरट, संघटक व पुणे बाजार समितीचे संचालक संतोष नांगरे, संजय सास्टे, महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन चे सुनील यादव यांची उपस्थिती होती……
………………………………..






















