Home मुंबई गांधी जयंतीच्या मुहूर्तावर बॉलिवूडमधून मोठी बातमी समोर आली आहे. जेष्ठ अभिनेते मनोज...

गांधी जयंतीच्या मुहूर्तावर बॉलिवूडमधून मोठी बातमी समोर आली आहे. जेष्ठ अभिनेते मनोज वाजपेयी साकारणार आहेत महात्मा गांधींची भूमिका!

40
0

*गांधी जयंतीला मोठा धमाका – महात्मा गांधींच्या भूमिकेत मनोज वाजपेयी – पहिला फोटो समोर!*

*बातमी:*
*मुंबई, दि. २ (Mai Media 24):* गांधी जयंतीच्या मुहूर्तावर बॉलिवूडमधून मोठी बातमी समोर आली आहे. जेष्ठ अभिनेते मनोज वाजपेयी साकारणार आहेत महात्मा गांधींची भूमिका!

NH Studioz आणि बनारस मिडियावर्क्स यांनी त्यांच्या बहुप्रतिक्षित *’गांधी अँड माय मदर’* या चित्रपटाचा पहिला फोटो रिलीज केला आहे.

प्रसिद्ध दिग्दर्शक सुधीर मिश्रा दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती नरेंद्र हिरावत आणि अनुभव सिन्हा यांनी केली आहे.

या चित्रपटात *मनोज वाजपेयी, वहिदा रेहमान, दिव्या दत्ता आणि सौरभ शुक्ला* यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

महात्मा गांधींच्या जीवनावर आधारित हा चित्रपट गांधीजींच्या व्यक्तिमत्त्वाचा एक वेगळा आणि मानवी पैलू उलगडणार आहे.

फोटोमध्ये मनोज वाजपेयी अगदी हुबेहूब गांधीजींसारखे दिसत आहेत!

*- प्रो. शीतल हरीष करदेकर, Mai Media 24*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here