Home मुंबई काँग्रेसच्या रेट्यानंतर BMC नरमली, ३९ हजार झोपड्या तोडण्याची कोणतीही कारवाई करणार नसल्याचा...

काँग्रेसच्या रेट्यानंतर BMC नरमली, ३९ हजार झोपड्या तोडण्याची कोणतीही कारवाई करणार नसल्याचा आयुक्तांकडून खुलासा – खा. वर्षा गायकवाड

71
0

काँग्रेसच्या रेट्यानंतर BMC नरमली, ३९ हजार झोपड्या तोडण्याची कोणतीही कारवाई करणार नसल्याचा आयुक्तांकडून खुलासा – खा. वर्षा गायकवाड
खासदार वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस शिष्टमंडळाने घेतली BMC आयुक्त अश्विनी भिडेंची भेट, झोपड्यांवर कारवाई केल्यास आंदोलन करु.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मोदी-शाहचे गुलाम, कोट्यवधी मतदारांचा संवैधानिक अधिकार हिरावून घेण्याचा डाव, ज्ञानेशकुमार यांना पदावरून हटवा..

मुंबई, दि. २८ सप्टेंबर …

मुंबईतील ३९ हजार १११ झोपड्या तोडण्याच्या महापालिकेच्या कारवाईसंदर्भात काँग्रेसने महानगरपालिका आयुक्तांची भेट घेऊन या कारवाईला स्थगिती देण्याची मागणी केली, परंतु अशी कोणतीही कारवाई करण्याचे आदेश दिले नसल्याचा खुलासा बीएमसी आयुक्त अश्विनी भिडे यांनी केला आहे. कारवाईच्या बातमीने गरिबांमध्ये असुरक्षेची व भितीची भावना पसरली होती पण आता त्यांनी घाबरू नये, असे आवाहन करत गरिबांच्या झोपड्यांवर हातोडा चालवल्यास काँग्रेस रस्त्यावर उतरून विरोध करेल, असा इशाराही मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी दिला आहे.

काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांचा भेट घेतली, यावेळी माजी मंत्री आमदार अस्लम शेख, आमदार डॉ. ज्योती गायकवाड, बीएमसीतील गटनेते अश्रफ आजमी, प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते.

या भेटीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना खासदार वर्षा गायकवाड पुढे म्हणाल्या की, शहरातील १४ फुटावरील ३९ हजार झोपड्या तोडण्याची मोहिम १ ऑक्टोबरपासून सुरु केली जाणार असल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमातून प्रकाशित झाल्या होत्या. महानगरातील ४० टक्के लोक झोपडपट्यांमध्ये राहतात. सत्ताधारी पक्षाने १८ फुटाच्या झोपड्या कायम करण्याचा प्रस्ताव आणला तर दुसरा प्रस्तावात जी+ १ ला संरक्षण देण्याचा आणला आहे. शहराच्या वेगवेगळ्या भागातील झोपड्यांसाठी वेगवेगळे नियम कशासाठी? श्रीमंतासाठी डीसी रुल बदलता, सवलती देता, श्रीमंतासाठी एक न्याय व गरिबांच्या झोपड्यांवर हातोडा हे कशासाठी? महापौर रितु तावडे यांना तर कारवाईची कल्पनाच नाही, यातून महापौर व प्रशासन यांच्यात समन्वयाचा अभाव दिसत आहे, असेही खा. वर्षा गायकवाड म्हणाल्या.

ज्ञानेशकुमारांना सेवेतून बडतर्फ करा..
निवडणूक आयोगाचा अंधाधुंद कारभार सुरु आहे. संविधानाने १८ वर्षांवरील प्रत्येक नागरिकाला मतदानाचा अधिकार दिला आहे, तो अधिकारच हिरावून घेतला जात आहे. कधी बोगस मतदार वाढवले जातात तर कधी मोठ्या प्रमाणात कपात केली जात आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीवेळी ४८ लाख मते वाढवण्यात आली. पश्चिम बंगालमध्ये ९० लाख मतदारांची कपात करण्यात आली. बिहारमध्येही मोठ्या प्रमाणात मतदार कपात करण्यात आली. आता एसआयआर मधून मुंबई महाराष्ट्रातून लाखो मतदार वगळले आहेत. राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगातील अनागोंदी कारभाराचा मुददा सातत्याने लावून धरला आहे. ज्ञानेश्वरकुमार यांच्यावर गंभीर आरोप आहेत, त्यांना पदावरून हटवा. ज्ञानेशकुमार हे मोदी-शाहची गुलामी करत आहेत. त्यांनी देशाचे संविधान व लोकशाहीसाठी काम केले पाहिजे. निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे पण भाजपा ज्ञानेशकुमार यांचे समर्थन का करत आहे, असा प्रश्नही खासदार वर्षा गायकवाड यांनी विचारला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here