Home सातारा / सांगली / सोलापूर / कोल्हापूर शरद इन्स्टिट्युटमध्ये एच.आर. कॉनक्लेव्ह संपन्न

शरद इन्स्टिट्युटमध्ये एच.आर. कॉनक्लेव्ह संपन्न

142
0

शरद इन्स्टिट्युटमध्ये एच.आर. कॉनक्लेव्ह संपन्न
आंतरराष्ट्रीय स्तरावरील कंपन्याचे एच.आर. यांच्याकडून मार्गदर्शन
यड्राव, ता.६ यड्राव येथील शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित कंपन्याचे ‘ए.आर. कॉनक्लेव्ह’ (मानव संसाधन परिषद) झाली. यावेळी प्रमुख एच.आर. अधिकारी यांचे मार्गदर्शन झाले. त्यानंतर ‘स्किल गॅप इन इंडिया- अपस्किलिंग अॅण्ड रिस्किलिंग इज नीड ऑफ हावर’ (भारतातील कौशल्यामधील तफावत – अपस्किलिंग आणि रिस्किलिंग ही काळाची गरज) व ‘चेंज एक्पेटेशन्स अॅण्ड चॅलेंजेस इन कॅम्पस हिरिंग’ (कॅम्पस नियुक्तीमधील बदलाची अपेक्षा आणि आव्हाने) या विषयावर चर्चा झाली. यावेळी संस्थेचे एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर अनिल बागणे प्रमुख उपस्थीत होते.
यावेळी हेक्झावेअरचे कॅम्पस रिक्रुटमेंटस हेड सौगता सेन यांनी ‘भारतातील कौशल्यामधील तफावत’ याविषयी विवेचन केले. ते म्हणाले, ‘कंपनीला विद्यार्थ्यांकडून वेगळ कौशल्य, टॅलेंट हवं असत. ते तुम्ही सर्वांनी आत्मसात करुन घ्यायला हवे. प्रत्येकाने नोकरीसाठी देशात व देशाबाहेर कुठेही जाण्याची तयारी ठेवायला हवी, तरच यश मिळेल. शरद इंजिनिअरिंगने कॉनक्लेव्हच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना खूप मोठी संधी निर्माण करुन दिली आहे.’
यावेळी ब्रिलिओच्या ऑपरेशनल एक्सलेन्स सौ. रितु शर्मा यांनी ‘विविधता आणि सर्व समावेशकता ही काळाची गरज’ याविषयी मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या, ‘सध्याचे इंजिनिअर खूप स्मार्ट आहेत. त्यांनी हा स्मार्टपणा आपल्या कार्यात दाखवून द्यायला पाहिजे. त्यांनी फक्त आयटी कंपन्यामध्येच नोकरीची अपेक्षा ठेवू नये. त्यांनी कोअर कंपनी, संशोधन, शेतीपूरक उद्योग, सेवा अशा विविध क्षेत्रात आपला ठसा उमटवायला हवा.’
टेक महिंद्राचे सिनिअर रिक्रुटमेंटस मॅनेंजर किर्ती नाईक यांनी ‘तरुणांच्या शिक्षणावर तंत्रज्ञानाचा प्रभाव’ यावर मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, विद्यार्थ्यांनी आपल्यामधील नकारात्मक गुण कमी करुन सकारात्मक गुण वाढविण्याकडे लक्ष दिले पाहिजे. कोणत्याही विभागाचा विद्यार्थी कंपनीत चालू शकतो. त्याच्याकडे कंपनीला आवश्यक तो गुण आसावा लागतो.’
श्री. बागणे म्हणाले, ‘प्रत्येक विद्यार्थ्याच्या हाताला काम मिळावे, या हेतूने संस्था कार्यरत आहे. या ग्रामिण भागातील विद्यार्थ्याच्या कुटुंबाचा आर्थिक स्तर उंचविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहे. विद्यार्थ्यांनी नोकरीसाठी देशात व देशाबाहेर कोणत्याही ठिकाणी जाण्याची तयारी ठेवावी. अशा कॉनक्लेव्हच्या माध्यमातून जगभरातील कंपन्याना काय टॅलेंट गरजेचे आहे याचे ज्ञान आपल्या सर्वाना मिळत आहे.’
यावेळी चर्चासत्रात ब्रिलिओच्या कॅम्पस रिक्रुटमेंट शांभवी खरे, सोपरा बँकीग सॉफ्टवेअर मॅनेंजर आमिर हसन, हेक्झावेअरचे कॅम्पस रिक्रुटमेंट मॅनेंजर कमलेश भोसले, जेनपॅक्टचे कॅम्पस टॅलेंट अॅक्विजिशन मॅनेंजर भुपिंदर नायर, इबिक्स इंडिया टॅलेंट अॅक्विजिशन हेड हर्ष राज जैन, डब्ल्यु.एस.पी. टॅलेंट अॅक्विजिशन मॅनेंजर अजय मलिक, एच.आर. सुप्रिया चटर्जी यांनी सहभाग घेतला. चर्चासत्रात समन्वयक म्हणून सोपरा स्टेरिआचे टॅलेंट मॅनेंजमेट सिनिअर मॅनेंजर गुरप्रित सिंग होते. यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या शंकांचे निरसन करुन घेतले.
कॉन्कलेव्हचे समन्वयक म्हणून ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट सेलच्या प्रा. नेहा सोनी यांनी काम केले. यासाठी सर्व डिन, विभाग प्रमुख, प्राध्यापक, प्राध्यापकेत्तर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here