Home मुंबई “विद्यार्थ्यांना संविधान शिकवण्याऐवजी सरकारने MPSCच्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत”: धनंजय शिंदे

“विद्यार्थ्यांना संविधान शिकवण्याऐवजी सरकारने MPSCच्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत”: धनंजय शिंदे

62
0

“विद्यार्थ्यांना संविधान शिकवण्याऐवजी सरकारने MPSCच्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत”: धनंजय शिंदे

MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला राजकीय रंग देणाऱ्या भाजपा आमदार विक्रम पाचपुते यांच्या वक्तव्याचा काँग्रेसकडून समाचार

मुंबई, दि. २३ सप्टेंबर २०२६ :
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला “राजकीय वळण” लागल्याचा आरोप करणे म्हणजे त्यांच्या न्याय्य प्रश्नांना बगल देण्याचा प्रयत्न आहे, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस तथा रोजगार व स्वयंरोजगार विभागाचे अध्यक्ष धनंजय शिंदे यांनी केली.

“MPSC विद्यार्थी परीक्षा प्रक्रिया, पारदर्शकता, भरतीतील विलंब आणि निकालाबाबत प्रश्न विचारत आहेत. त्यांना संविधान शिकवण्याऐवजी सरकारने त्यांच्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत. कलम ३१७ चा संदर्भ देऊन विद्यार्थ्यांच्या मागण्यांना सरसकट ‘असंवैधानिक’ ठरवता येणार नाही. सरकारला एखादी मागणी चुकीची वाटत असेल तर त्यावर स्पष्ट आणि कायदेशीर उत्तर द्यावे,” असे शिंदे म्हणाले.

“विद्यार्थ्यांच्या आंदोलनामागे काँग्रेस शोधण्याऐवजी MPSC व्यवस्थेतील समस्या सोडवा. परीक्षा व भरती प्रक्रिया पारदर्शक, विश्वासार्ह आणि वेळबद्ध करणे ही सरकारची जबाबदारी आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here